ईतर

हरडफ शिवारात गोठ्यातील गायीवर हिंस्त्र वन्यप्राण्याचा हल्ला ; गायीचा पाडला फडशा…

'शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरण ; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यास तातडीच्या मदतीची मागणी"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

अंजनखेड/ (गजानन चोपडे)
हरडफ शिवारात शेतातील गोठ्यावर बांधलेल्या गायीवर काल दि. २२ रोजी रात्री हिंस्त्र वन्यप्राण्याचा हल्ला झाल्याने हल्ल्यात गोठ्यात बांधलेल्या गाईचा जागीच फडश्या पाडल्याची घटना घडल्याने शेतकरी व शेतमजूरांत एकच खळबळ उडाली असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यास तातडीच्या शासकीय मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे…
माहूर तालुक्यातील मौजे हरडफ शिवारातील गणेश रामराव टनमने यांचे शेत सर्वे नं. 97 मध्ये  जनावरांसाठी गोठा बांधलेला आहे.. त्यामुळे शेतावरील दैनंदिन कामे आटोपल्यानंतर पाळीव जनावरांना ते शेतातील गोठ्यावरच बांधतात.. तथापि काल दिनांक 22 फेब्रुवारी रोजी शेतातील दैनंदिन कामे आटोपून झाल्यानंतर जनावरांना शेतातील गोठ्यात बांधून ते घरी गेल्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या गाईवर अज्ञात हिंस्त्र पाण्याने हल्ला केला असून या हल्ल्यात या हल्ल्यात गाईच्या जागीच फडश्या पडल्याचे चित्र आज दिसून आले.. सदर प्रकरणी संबंधित शेतकऱ्याने माहूर वनविभागाकडे तक्रार करून घटनेची माहिती दिल्याचे सांगितले असून झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी वनविभागाकडे केली असल्याचे सांगितले आहे… तर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनही घटनास्थळावर जाऊन सदर घटनेची सखोल माहिती घेऊन पंचनामा केल्याचे कळते…

 

“विशेष म्हणजे माहूर तालुक्यातील वाई बाजारसह मदनापुर, हरडफ, गोकुळ, गोंडेगाव, मच्छिंद्र पार्डी, आष्टा, माहूर, यासह तालुक्यातील अनेक गावात यापूर्वीही जंगलातील हिंस्त्र प्राण्यांनी पाळीव जनावरांवर हल्ला केला आहे.. त्यातच उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच जंगलातील पाण्याचे स्त्रोत संपुष्टात येत असल्याने हिंस्त्र वन्यप्राणी पाण्यासाठी गावकुुसाकडे वाटचाल करीत आहेत… यामुळे पाळीव जनावरांसोबतच मानवी जीवालाही धोका निर्माण झाला असून यावर उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे.. त्यामुळे माहूर वनविभागाने या घटनेपासून बोध घेऊन तातडीने उपाययोजना करावी.. तसेच हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची पुढील कर्तव्य बजावावे.. अशी माफक अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close