माहूर येथे संत रविदास महाराज यांची जयंती साजरी….
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद माहूरच्या वतीने आपल्या विचाराने समाजाची दिशा बदलणारे आद्य गुरु तथा संत श्री रविदास महाराज यांची 647 वि जयंती संजय बनसोडे यांच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली…
यावेळी जेष्ठ पत्रकार तथा विचारवंत नंदू संतान यांनी संत श्री रविदास महाराज यांच्या जीवनावर तथा त्यांच्या समाज कार्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले यानंतर जेष्ठ विचारवंत तथा पत्रकार नंदकुमार जोशी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचे सह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले..
यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांच्यासह नंदकुमार जोशी, ज्ञानेश्वर लाड, सेवानिवृत्त शिक्षक श्रीरंग जगताप, जितेश जाधव आष्टा, वसंता राठोड, पत्रकार इलियास बावाणी, राज ठाकूर, राजू दराडे, निरधारी जाधव, अखिल भारतीय गुरु रविदास महाराज परिषदेचे संजय बनसोडे, अँड. नितेश बनसोडे, राम कांबळे यांचे सह कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते…