सामाजिक

गरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाहाचा संपूर्ण खर्च उचलून ‘श्री स्वामी समर्थ’ अन्नछत्र मंडळाने घडवला नवा आदर्श…

"कौटुंबिक परिस्थिती नसलेल्या कुटुंबियांनी मदतीसाठी संपर्क करण्याचे केले आवाहन..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

श्रीक्षेत्र माहूर/प्रतिनिधी

गरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाहाचा संपूर्ण खर्च उचलून ‘श्री स्वामी समर्थ’ अन्नछत्र मंडळाच्या वतीने एक आदर्श पायंडा पाडला असून आपल्या सामाजिक बांधिलकीचा वसा जपताना कौटुंबिक परिस्थिती नसलेल्या गरीब कुटुंबियांनी आपल्या पाल्यांच्या विवाहप्रसंगी मदतीसाठी ‘श्री स्वामी समर्थ’ मंडळाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे…

 

माहूर येथील विविध समाजकार्यासह अन्नदानातही उल्सेखनीय कार्य बजावत असलेल्या येथील “श्री स्वामी समर्थ” अन्नछत्र मंडळाकडून मौजे हडसनी येथील गरीब कुटुंबातील मुला-मुली चा विवाह लावून देत संपूर्ण खर्च उचलण्याची किमया करून तालुक्यात समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.. अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त राजकुमार भोपी पाटील यांच्यासह विजय भाऊ गवारे तसेच अन्नछत्र मंडळाच्या सर्व विश्वस्ताकडून हा विवाह सोहळा संपन्न झाला..

 

     माहूर तालुक्यातील मौजे हडसनी येथील वर भाऊ देविदास शिंदे तर वधू सृष्टी भारत जाधव यांच्या परिवाराची परिस्थिती बिकट असल्याने त्यांचा विवाह विष्णू कवी मठ येथील सभागृहात पार पडला.. तर भोजना चा कार्यक्रम श्री स्वामी अन्नछत्र मंडळात पार पडला..

 

यावेळी वर वधूंना शुभाशिष देण्यासाठी आलेल्या मान्यवरांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या या उल्लेखनीय कार्याची कौतुक केले असून गोरगरीब जनतेने खर्च करण्याची परिस्थिती नसल्यास त्यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त राजकुमार भोपी पाटील, विजय भाऊ गवारे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विश्वस्ताकडून करण्यात आले.. यावेळी मनोज भाऊ कीर्तने, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सौ. नम्रता कीर्तने, हडसणी येथील माजी सरपंच दीपक पाटील शिंदे, अवधूत पाटील जाधव, सुनील पाटील जाधव हडसनीकर, सुदेश मुक्कावार, इंगळे पाटील, प्रदीप तुप्तेवार, राजकुमार वाघमारे, महेश बिंगेवार, महिला पत्रकार सुरेखाताई तळणकर यांचे सह मान्यवर उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close