ईतर

‘ओव्हरटेक’ च्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून बोलेरो पलटी ; “वेळी आली, पण काळ आला नव्हता” ची प्रचिती…

"8 जण बालंबाल बचावले ; वाई बाजार येथील वाघाई टेकडीजवळील घटना"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून आश्चर्यकारकरित्या पलटी झालेल्या बोलेरो गाडीतून ८ जण बालंबाल बचावले. ही घटना वाई बाजार येथील वाघाई टेकडीनजीक आज दु. सव्वा बाराच्या सुमारास घडली…
  घटनास्तळावरील प्रत्यक्षदर्शींच्या कथनीनुसार माहूर तालुक्यातील मौजे मांडवा येथून एम. एच. २६ बी.सी. २९४९ या बोलेरो गाडीतून ४ महिला व पुरूष ज्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश असलेले एकूण ८ जण माहूर तालुक्यातील पार्डी (रे) इथे घरगुती कामानिमित्त जात होते. दरम्यान आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास वाई बाजारजवळील वाघाई टेकडीनजीक वाघाई बारपासून अगदी काही मिटर अंतरावर सदर बोलेरो गाडीचा चालक एका वाहनाला ओव्हरटेक करीत होता. त्याचवेळी समोरून येत असलेल्या वाहनामुंळे बोलेरो गाडीच्या चालकाचे बोलेरोवरील नियंत्रण सुटले. व बोलेरो रस्त्याच्या कडेला खोलवर जावून आश्चर्यकारकरीत्या पलटी झाली..!  या घटनेत प्रवास करणारे प्रवासी बालंबाल बचावले असून गाडीचे किरकोळ नुकसान वगळता यातील कुणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नसल्याने “वेळ आली होती… परंतू काळ आला नव्हता..!!” अशी भावना प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त केली जात आहे…
“सदर घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्यातील कर्मचारी तथा वाई बाजार बीटचे पो. हे. काँ. कुमरे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली व विचारपुस केली….!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close