नोकरी संदर्भ

रेतीतस्करांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची बदली….

'मेघना कावली' भा.प्र.से. यांची किनवट येथे सहायक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
  रेतीतस्करांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर किनवटचे सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची बदली झाली असून त्यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे या रिक्त पदावर झाली आहे. तर त्यांच्या जागी मेघना कावली यांची नियुक्ती करण्यात आली आहे…
    आज दि. २३ रोजी नितीन गद्रे, अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या आदेशानुसार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट, आणि सहायक जिल्हाधिकारी, उपविभाग किनवट या पदावर रूजू असलेले कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, पुणे येथे करण्यात आली असून या रिक्त पदावर श्रीमती मेघना कावली यांची नियुक्ती केल्याचे पत्र महाराष्ट्र शासनाचे सहसचिव सु.मो.महाडिक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे…
विशेष म्हणजे कार्तिकेेयन यांनी मागील अनेक महिण्यांपासून किनवट/माहूर या दोन्ही तालुक्यातील रेती तस्करीला कमालीचा लगाम लावून रेतीतस्करांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे रेतीतस्करांसाठी अप्रत्यक्षरीत्या “अवघड जागचे दुखणे” बनलेले सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या बदलीसाठी अनेकांनी प्रयत्न केले.. तर कहींनी तर आपले देव पाण्यात ठेवले होते.. अखेर रेतीतस्करांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर कार्तिकेयन एस. यांची बदलीचे पत्र धडकताच रेतीतस्करांत चैतन्याचे वातावरण पसरल्याचे सांगण्यात येत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close