सामाजिक

माहूर येथील बाबा सोनापीर यांच्या ५ दिवसीय ‘उर्स’ ला सुरूवात…!

कव्वाली - समाजप्रबोधन सह विविध कार्यक्रमाचे आयोजन..!

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

माहूर,प्रतिनिधी

तीर्थक्षेतत्र माहूर शहरात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सनाउल्लाह शहा उर्फ सोनापीर बाबा यांची पुरातन दर्गाहची मागील ५५ वर्षाची परंपरा कायम ठेवताना या यात्रा उर्स महोत्सवाला मंगळवार दिनांक ५ पासून शाही संदल ने सुरुवात झाली आहे…

 

माहूर येथील सोनापीर बाबाचा उर्स यात्रेची पंचक्रोशीत नागरिकात विशेष आवड असते. या उर् महोत्सवात आंध्र, तेलंगानासह राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरिक हजेरी लावतात. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होते. शेकडो हाताना या यात्रेच्या माध्यमातून काम मिळते.

 

 

दि. ५ मार्च रोजी हैदराबाद येथील सुफी कव्वाल इकबाल शकील वारसी यांची महफिले समा…  या कार्यक्रमाबरोबरच दि. ६ मार्च रोजी नसीम जानी कव्वाल (नागपुर) यांचा… दि. ७ मार्च रोजी सलीम जावेद कव्वाल मुंबई यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. दि. ९ मार्च रोजी कीर्तनकार सप्त खंजरी वादक तुषार सुर्यवंशी यांचा समाजप्रबोधन चा कार्यक्रम होणार आहे. दिनांक १० मार्च रोजी इंटरनॅशनल ख्याती चे ” फेम टिव्ही सिंगर मुराद आतिश यांचा कव्वाली चा कार्यक्रम होणार आहे.या शिवाय दिनांक ८ रोजी दुपारी कुस्त्यांची दंगल होणार आहे.अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे उर्स कमेटी ने दिली आहे…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close