ईतर

पत्रकारावरील हल्ल्याचा माहूर पत्रकार संघाकडून निषेध ; कठोर शिक्षा करण्याची मागणी

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

श्रीक्षेत्र माहूर

नांदेड येथील दै.एकमतचे प्रतिनिधी राहुल गजेंद्रगडकर यांना धक्काबुक्की, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद माहूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येऊन तहसील कार्यालयात मंगळवारी दिनांक 5 रोजी निवेदन देण्यात आले आहे.

 

दि.3 मार्च रोजी राहुल गजेंद्रगडकर वार्तांकन करण्यासाठी गेले होते. दुपारी ३:३० ते ४ च्या दरम्यान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक कर्मचारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा निकाला घोषीत झाला. जुने भु विकास बैंक आय टी आय परिसर येथे निकालानंतर दोन गटात हाणामारी सुरु होती ही बाब लक्षात आल्यानंतर राहुल गजेंद्रगडकर यांनी घटनेचे छायाचित्र काढल्यानंतर ते एकमत कार्यालयाकडे येत असतांना त्यांना रस्त्यात अडवून अज्ञात तिघा जणांनी धक्काबुकी करत मारहाण केली तेथील उपस्थित नागरीकांनी गजेंद्रगडकर यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर राहुल गजेंद्रगडकर आपल्या कार्यालयाजवळ आले असता पुन्हा दोघां जणांनी त्यांना अडवले त्यांचा फोटो काढून जिवे मारण्याची धमकी दिली…

 

   मंगळवारी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करून हल्ला करणाऱ्या आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देणा-या हल्लेखोरांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्या नुसार गुन्हे दाखल करुन त्यांच्याविरुध्द कठोर शिक्षा करावी असे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी, साजिद खान, इलियास बावानी, गजानन भारती, बालाजी कोंडे, राज ठाकूर, गजानन कुलकर्णी, राजीक शेख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close