ईतर

माहूर येथे घरगुती गँस सिलेंडरचा स्फोट ; साडेचार लाखांची रोकड जळून खाक…

"संसारोपयोगी साहित्यही जळाले ; जिवितहानी मात्र नाही.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर/प्रतिनिधी
  माहूर येथील आज सकाळी पावनेदहाच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना घरगुती गँस सिलेंडरच्या स्फोटात घरातील संसारउपयोगी साहित्यासह अन्नधान्य व घरातील तब्बल साडेचार लाखांची रोकड जळून खाक झाल्याच्या घटनेने एकच खळबळजनक उडाली असून या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे...
   माहूर येथील तलाठी सज्जा यांनी घटनास्थळावरील पंचनाम्यात नमूद केलेल्या माहितीनुसार येथील वार्ड क्र. ३ मधील बुद्धभुमीपरिसरातील आनंदाबाई उत्तम जाधव यांच्या घरी आज दि. २१ रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान स्वयंपाक चालू असताना घरातील एच.पी. कंपनीच्या घरगुती गँस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील जिवनावश्यक वस्तूंसोबतच अन्नधान्य ज्यामधे घरातील डाळी, तांदूळ, गहू तसेच लाकडी पलंग व लोखंडी आलमारीत ठेवलेले ४ लाख ५० हजाराची रोख रक्कम जळून खाक झाले असून या संपुर्ण घटनेत मात्र कोणत्याही प्रकारची जिवीतहानी न झाल्याने ‘वेळ आली होती.. पण् काळ आला नव्हता..!’ ची भावना जायमोक्यावरील प्रत्यक्ष परिस्थिती पाहून पाहणारी मंडळी आश्चर्य व्यक्त करीत आहेत……
…..घटनेची माहिती मिळताच माहूर न.पं.चे  कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या सूचनेवरून नगरपंचायत माहूर अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश जाधव यांच्यासह मन्सूर शेख, प्रविण शेंडे तसेच अभियंता विशाल ढोरे हे घटनास्थळी हजर होवून घटनास्थळी लागलेली आग शर्थीने विझवण्यात यश मिळविले.. तर जायमोक्यावर तलाठी सज्जा माहूर यांनी प्रत्यक्ष हजर होत घटनास्थळाची पाहणी करून पंचासमक्ष झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close