क्राइम

किनवट येथे भर चौकात अंगावर पेट्रोल टाकून पतीने पत्नीला पेटविले…

"किनवटच्या भाजी मार्केट मधील काल सायं. साडेसातची घटना"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

किनवट/माहूर

किनवट येथे भर चौकात पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना काल दि. ११ रोजी सांयंकाळी साडेसातच्या सुमारास घडली असून व्यापा-यांच्या प्रसंगावधानाने पिडीत महिलेचा जीव वाचला असला तरी तिची प्रकृर्ती खालावल्याने तिला उपचारासाठी तेलंगणाच्या आदिलाबाद कडे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे…

 

काल शनिवार दि. ११ मे रोजी किनवट शहरालगत असलेल्या गोकुंदा परिसरातील दत्तनगर येथील एक ३५ वर्षीय महिला भाजीपाला खरेदीसाठी किनवटच्या भाजी मंडईत आली होती.. त्यावेळी भाजीपाला, मसाले व इतर संसारोपयोगी साहित्य खरेदी करून ती महिला घराकडे परतत असतांना तिच्या मागावर असलेला तिचा पती अर्जुन सातपुते हा सोनपापडीच्या डब्यात पेट्रोल घेऊन आला होता.. त्यावेळी त्याने भर बाजारातच पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत ती महिला चांगलीच भाजली…

 

दरम्यान घटनेचे प्रसंगावधान राखत तेथील व्यापाऱ्यांनी पाणी ओतून महिलेला वाचविले. यावेळी तिचा आरोपी पती अर्जुन हा फरार झाला. व्यापारी व नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर बऱ्याच उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने पोलीस वाहनातून जळीत महिलेला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर जळालेल्या महिलेची प्रकृर्ती खालावल्याने रात्री उशीरा तिला तेलंगणातील आदिलाबाद येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगीतले आहे…

 

विशेष म्हणजे जळीत महिलेला ३ अपत्य असून आरोपी पती अर्जुन सातपुते याने पत्नीला का पेटविले ? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून ताज्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी अर्जुन सातपुते यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेलंगणातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे सीमेवरील चेकपोस्टना अचानक भेट देऊन पाहणी करण्यासाठी या भागात आले असता, ही घटना कळाल्यानंतर त्यांनी किनवट पो.स्टे.भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close