नोकरी संदर्भईतर

आष्टा फाटा येथील ‘त्या’ जळीत कांड प्रकरणी माहूर पोलीसांकडून शोधपत्रिका जारी….

मयत महिलेबद्दल माहीती देण्याचे माहूर पोलीसांचे आवाहन..

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

    हिवळणी येथील ‘त्या’ जळीत कांड प्रकरणी माहूर पोलीसांकडून शोधपत्रिका जारी केली असून पोलीस प्रशासनाकडून जनतेला मयत महिलेबद्दल माहीती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे…

   याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात दाखल आ .मृ. क्र. १०/२०२४ कलम १७४ सी. आर.पी. सी. अन्वये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यात एक अनोळखी स्त्री जातीचे महीला वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे जिची उंची ५ फुट रंग सांगता येत नाही.. केस जळालेले.. नाक आखुड छोटे…शरीर बांधा सडपातळ, अंगावरील कपडे :- अर्धवट जळालेल्या अवस्थेत लाल रंगाचे परकरचा तुकडा, अर्धवट जळालेला अवस्थेत.. एक करड्या रंगाचा ब्लाऊज त्यावर सोनेरी रंगाची झालर असेलेली चमकेली तसेच सोनेरी रंगाचे टिकल्या असलेली लेस, तिचे हातात काचेचे व पिवळ्या धातुचे चार बांगड्या, दोन्ही पायात पांढ-या धातुच्या रंगाचे सहा जोडवे, कानात पिवळया धातुच्या रंगाचे दोन कर्णफुले, पिवळया धातुचे पेंडॉल व मणी असलेले पोत, प्लास्टीकचे पांढ-या रंगाचे खडे असलेले हेअर क्लिप, उजव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटात एक पांढ-या धातुची आंगठी… असलेल्या सदर मृत पावलेल्या वरील वर्णनाच्या महीलेेेचे नातेवाईक मिळुन आल्यास पोलीस स्टेशन माहूर जि नांदेड येथे खालील नंबरवर सपर्क करुन कळविण्यास विनंती असल्याची शोधपत्रीका माहूर पोलीसांकडून जारी करण्यात आली असून सदर महिलेबाबत कुणालाही काही माहिती प्राप्त झाल्यास माहूर पोलीस ठाण्याच्या खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन माहूर पोलीसांकडून करण्यात आले आहे…
पोलीस ठाणे माहुर जि नांदेड
स.पो.नि. शिवप्रकाश मुळे :- ९९२३१७८९०९
स.पो.नि. एस. एम. परगेवार – ९०२८८४६६९१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close