गुंडवळ ते तांदळा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था…
'उखडलेल्या रस्ता व पुलाने पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता'
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर, प्रतिनिधी
तब्बल विस वर्षांपासून चांगल्या रस्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या तांदळा वासीयांच्या नेहेमीच्या रहदारीचा गुंडवळते तांदळा या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून नावालाच डांबरी असलेल्या या रस्त्याची दुरावस्था व उखडलेल्या पुलामुळे येत्या पावसाळ्यात संपर्क तुटण्याची भिती तांदळा वासीयांना लागल्याने तातडीने सुधारणा करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे…
माहूर तालुक्यातील अत्यंं दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या मौजे तांदळा या पहाडपट्टीतल्या दुर्मग गावाला थेट तालुक्याला जोडणारा तांदळा- गुंडवळ- रूई- केरोळी फाटा असा एकमेव मार्ग असून हाच रस्ता तांदळापासून पुढे ईवळेश्वर पर्यंत पोहोचतो… विशेष म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत असलेला गुंडवळ ते तांदळा हा रस्ता तत्कालीन आमदार डि.बी. पाटील यांच्या कार्यकाळात सन 2001- 2002 मध्ये बनवण्यात आला होता… तेंव्हापासून अद्यापही या रस्त्याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही पाठ फिरवली असून जागोजागी खड्डेच खड्डे पडून रस्ता पुर्णपणे बंजर जालेला असतानाच काही पुलावरचा स्लॅबही उखडून जाऊन मोठमोठे छिद्र पडले असल्याने वारंवार रस्ता दुरूस्तीची व नवीन डाबरीकरणाची मागणी करूनही शेवटी तांदळा वासीयांना कायम निराशाच पदरी पडताना दिसत असून आजमितीस रस्त्याची अवस्था पाहील्यास येत्या पावसात तांदळा वासीयांचा तालुक्याचा संपर्कच तुटेल अशी एकंदरीत परिस्तिती निर्माण झाली आहे…
त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे बनले असून 100 टक्के शेतकरी वर्ग असलेल्या तांदळा वासीयांच्या पुढील अडचणी लक्षात घेवून या रस्त्याचे तातडीने पुनरनिर्माण करावे अशी मागणी तांदळा येथील ग्रामस्थांनी केली आहे…