नोकरी संदर्भबिझनेस

माहूर तालुक्यातील ‘तांदळा’ बंधा-याबरोबरच रूई येथील बंधारा ही मातीमिश्रीत नाल्याच्या रेतीनेच…

'संबंधित विभागाचे अक्षम्य दर्लक्ष ; नदीच्या रेतीचा वापर करीत असल्याचा ठेकेदाराचा दावा फोल..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

      माहूर तालुक्यात सुरू असलेल्या तांदळा येथील मृद व जलसंधारणाच्या बंधा-याप्रमाणेच तालुक्यातील रूई येथे होत असलेल्या बंधा-यातही प्रचंड बोगसगीरी होत असून या अत्यंत सुमार दर्जाच्या बांधकामांत शंभर टक्के नाल्याच्याच रेतीचा वापर असल्याने दोन्ही बंधा-याच्या कामचलाऊ बांधकामाकडे संबंधित विभाग जाणिवपुर्वक डोळेेझाक करीत असल्याने संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत…
   माहूर तालुक्यात यावेळी अनेक ठिकाणी मृद व जलसंधारण विभागायच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधा-यांची कामे प्रगतीपथावर असून काही ठिकाणची कामे प्रस्तावित आहेत…सदरची कामे मंत्रीमंडळातील एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाने विकत आणून अगदी चने फुटाण्याप्रमाणे स्थानिक ठेकेदारांना विकल्याची कुजबूज आहे.. शिवाय सदरील कामांची खरी गरज असलेली ठिकाणे सोडून नको त्या ठिकाणी हे बंधारे बांधण्याचा उपद्व्याप संबंधित  टक्केवारीतल्या  पुढा-यांसह स्थानिक तसेच ठेकेदारानी केला असून… माहूर तालुक्यातील तांदळा येथील बंधा-याच्या बोगसगीरीचा उच्चांक मोडीत काढत असतानाच रूई येथील बंधारादेखील त्याचाच कित्ता गिरवताना दिसत आहे… 
दरम्यान मागील आठवड्यात आमच्या वृत्तवाहीनीने वृत्त प्रकाशित करून तांदळा येथील ‘त्या’ बंधा-याची बोगसगीरी उजेडात आणल्यानंतर तांदळा येथील त्या ठेकेदाराकडून पन्नास ट्रिप नदीची रेती आणल्याचा आव आणण्यात आला होता…परंतू आज सदरचे काम मातीमिश्रीत नाल्याच्याच रेतीने होत असून… नदीची रेती आणल्याचा आव केवळ संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष ठिकाण्यावर येवू नयेत यासाठीच असल्याचे दिसून आले… तर रूई नजीकच्या बंधाराही नाल्याच्याच रेतीने होत असून टेकेदाराचा हा उपद्व्याप जास्तीत जास्त माया शिल्लक रहावी यासाठीच असल्याचे नागरीकांकडून उघडपणे बोलले जात आहे… 
“विशेष म्हणजे या बंधा-यासाठी किमान ८५ लक्ष ते १ कोटी रूपयाचा निधी शासनाने मंजूर केल्याची खात्रीलायक माहीती आहे..तर माहूर तालुक्यात यावेळी अनेक ठिकाणी मृद व जलसंधारण विभागायच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधा-यांची कामे प्रगतीपथावर असून अनेक ठिकाणची कामे प्रस्तावित आहेत…सदरची कामे मंत्रीमंडळातील एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाने विकत आणून अगदी चने फुटाण्याप्रमाणे स्थानिक ठेकेदारांना विकल्याची कुजबूज असून खरी गरज असलेली ठिकाणे सोडून नको त्या ठिकाणी हे बंधारे बांधण्याचा उपद्व्याप संबंधित टक्केवारीतल्या  पुढा-यांसह स्थानिक तसेच ठेकेदार करत असल्याचे वास्तव आहे….. एकंदरीतच हा उपद्व्याप दर्जेदार काम न करता व कुणाला काहीही न कळता जास्तीत जास्त माया शिल्लक रहावी यासाठीच असल्याचे नागरीकांकडून उघडपणे बोलले जात आहे…त्यामुळे शासनाने लोकोपयोगी कामासाठी दिलेला निधी बनवाबनवी करणा-या भुरट्यांच्या घशात जात असल्याने संबंधित विभागाकडून तातडीने पावले उचलने गरजेचे असून तातडीने संबंधितांवर कारवाई करून दर्जेदार काम करावे अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close