
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
सायफळ येथील घरातून विकल्या अवैध दारूविक्रीवर लगाम घालून अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी महिला सरसावल्या असून आक्रमक पवित्रा घेत मोठे आंदोलन छेडण्याचा संकल्प येथील महिलांनी केला आहे…
माहूर तालुक्यातील व सिंदखेड पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मौजे सायफळ येथील शेख जावेद शेख इब्राहीम आणि विष्णू माधव राऊत हे दोघे आपल्या राहत्या घरातून अवैधपणे दारूची विक्री करत असून त्यामुळे गावामध्ये भांडण, तंटा वाढण्याबरोबरच अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.. तसेच भांडण तंट्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारणांस्तव सदर अवैध दारूविक्रीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सायफळ येथील सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी..
अशी मागणी गावातील महिलांसोबतच सुजाण नागरिकांनी सिंदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.. दिलेल्या निवेदनावर नंदाबाई बाबाराव राऊत यांच्यासह सुमनबाई शामराव रावते, रंजना पुनवटकर, रेखा रमेश कुमरे, सह गावातील शेकडो महिलांच्या स्वाक्ष-या आहेत…
विशेष म्हणजे यातील एका दारूविक्रेत्याने स्वत:च्या अवैध दारू विक्रीला संरक्षण मिळावे यासाठी स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगून तुम्हाला काय करायचे ते करून घ्या… असे म्हणत महिलांना अर्वाच्च भाषेत बोल बोलत असल्याची बाब काही महिलांनी बोलून दाखवली आहे..
“सायफळ येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे गावात सतत भांडण तंटे होत असून दारूमुळे अनेक कुटुंबात देखील भांडणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे गावातील सर्व महिला भगिनींनी पुढाकार घेवून सायफळ येथील अवैध दारूविक्रीच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रारी केल्या आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष न दिल्यास दारूमुळे त्रस्त असलेल्या महिला भगिनींकडून मोठे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे अनेक महिला भगिनींनी सांगितले आहे…
– कपिल माणिकराव शेंडे, उपसरपंच ग्रा.पं. सायफळ ता. माहूर

