नोकरी संदर्भईतर

रोपवाटिकेसाठी दिलेल्या शेतजमीनीचे भाडे मागितल्याने शेतक-यावर गुन्हे दाखल करण्याचे माहूर वनपरिक्षेत्र अधिका-याचे फर्मान….

"चार वर्षांपासून तब्बल 6 लाखाचे भाडे थकविले ; शेतक-यावर उपासमारीची वेळ.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

किनवट/माहूर

   वनविभागामार्फत रोपवाटिकेसाठी भाडेतत्वावर घेतलेल्या शेतजमीनीचे भाडे न देता तब्बल चार वर्षांपासून थकविल्यानंतर शेतक-याने भाड्याची मागणी करताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चक्क शेतक-यावर गुन्हा दाखल करण्यासंबंधीचे पत्र दिल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली असून उपासमारीची वेळ आलेल्या शेतक-याने ही गंभीर बाब वरीष्ठ अधिका-यांना लेखी स्वरूपात कळवून थकविलेले भाडे देण्याची विनंती केली आहे…

 

माहूर तालुक्यातील मोजे तुळशी येथील शेतकरी अनंतराव शरदचंद्र देशमुख यांची शेतजमीन सर्वे नं. १ मधील ०.४० आर. शेतजमीन लागणारी विज व पाणीव्यवस्थेसह वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांनी माहूर येथील अँडव्होकेट & नोटरी पंजाबराव एम. गावंडे यांच्याकडे नोटरी केलेल्या करारनाम्याद्वारे दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी भाडेतत्वावर रोपवाटीकेसाठी घेतली होती. त्यावेळी करारनाम्यावर भाड्याचे रकमेचा उल्लेख न करता प्रतिवर्ष एक लाख पन्नास हजार रूपये सदर शेतक-याला भाडे ठरविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्यात आली.. परंतू त्यानंतर झालेल्या करारनाम्याप्रमाणे देऊ असलेले भाडे वनविभागाने दिलेच नसल्याची तक्रार संबंधित शेतक-याने केली असून चार वर्षाचे सहा लाख रुपये भाडे थकवून वनविभाग शेतक-यास वेठीस धरत असल्याने ही बाब लेखी निवेदनाद्वारे संबंधित शेतक-यांने वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना कळवून थकलेल्या रकमेची मागणी केली आहे…

 

 

चार वर्षाचे तब्बल सहा लाख रूपये थकविल्यानंतर व्यथित झालेले देशमुख यांनी भाड्याच्या रकमेसाठी येथील वनपाल व वनरक्षकाकडे वारंवार मागणी केली होती. परंतू त्यांना सातत्याने ‘कुशल बिल’ आल्यावर देवू असे नेहेमीचे उत्तर मिळत होते.. यामुळे तब्बल चार वर्षांपासून भाडे थकल्याने देशमुख यांनी भाड्याच्या रकमेसाठी तगादा लावल्याने चवताळलेल्या वनपरिक्षेत्र अधिका-यांनी चक्क शेतक-याविरोधातच पोलीसांत तक्रार द्या.. असे लेखी पत्र तेथील वनरक्षकाच्या नावे काढल्याची गंभीर बाब पुढे आली असून “चोराच्या उलट्या बोंबा” या उक्तीचा प्रत्यय देणा-या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने वनविभागाच्या दंडेलशाहीविरूद्ध प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे…

 

“विशेष म्हणजे तत्कालीन वनपाल मधुकर राठोड व वनरक्षक श्रीमती यु.जी. सोनटकके यांनी करारनामा करण्यापुर्वी दिलेल्या शेत जमीनीचा वार्षीक मोबदला १,५०,०००/-रु. ऐवढा दिला जाईल सदरची रक्कम ही कामाचे कुशल बिल निघाल्यावर देण्याची हमी देखील दिली होती. परंतू दोघांनीही अद्याप कुशल बिल अद्यापही मिळालेच नाही का..? असा प्रश्न देशमुख यांना पडला असून करारनाम्या प्रमाणे शेतकऱ्याचे भाडे न देता उलट शेतकऱ्यावरच पोलीसात तक्रार करा अशा लेखी सुचना केल्याने शासनाच्या योजनेसाठी स्वतःची शेत जमीन देणाऱ्या शेतक-यावर स्वत:लाच आरोपी म्हणण्याची वेळ येवून ठेपली आहे.. तर वनपरिक्षेत्र अधिकारी अधिकारी (प्रा) रोहित जाधव यांनी केलेल्या करारनाम्या प्रमाणे २०२१ मध्ये सदरील शेतजमीन वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर वर्ष २०२१-२२, २०२२-२३० २०२३-२४, २०२४-२५ असे एकूण चार वर्षाचे तब्बल ६ लाख रुपये मला वनविभागाकडून शेत जमीनीचे भाडे वनविभागाने थकविल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचेही त्यांनी निवेदनात सांगितले आहे..

 

या संपुर्ण प्रकाराने वैतागलेल्या शेतक-याने प्रधान वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्यासह अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर, वनसंरक्षक नांदेड, सहाय्यक उपवनसंरक्षक किनवट तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांना करारनाम्याच्या प्रतीसह अनेक संदर्भ देवून दि. २९ ऑगस्ट रोजी लेखी निवेदन दिले असून आजवरच्या थकीत रक्कम तात्काळ देण्याची मागणी केली असून तत्कालीन वनरक्षक श्रीमती यु.जी. सोनटक्के व वनपाल मधुकर राठोड यांनी प्रत्यक्ष ठरवून दिल्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी नाहूर यांनी लिहून दिलेल्या करारनाम्यानुसार माझ्या जमीनीचा मोबदला तातडीने देण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे…

 

“शेतकरी अनंतराव देशमुख यांनी पुढे आणलेल्या या रोपवाटीका प्रकाराने वनविभागात चालू असलेल्या एका नव्या घोटाळ्याची चाहूल लागली असून ठरलेल्या भाड्याची करारनाम्यात नोंद न घेता केवळ मोगम स्वरूपात व्यवहार ठरवणा-या वनविभागाने रोपवाटीकेच्या नावावर काही गडबड घोटाळा तर केला जात नाही नां..? याबाबत चर्चाना उधान आले असून शेतक-यासोबत व्यवहार ठरवून देखील चार वर्षाचे सहा लाख रुपये भाडे का व कुणामुळे थकविले..? अद्यापही कुशल बील मिळालेच ही का..? ठरलेली रक्कमेेेची नोंद करारनाम्यात न घेण्यामागचे गौडबंगाल काय..? इत्यादी अनेक प्रश्नांना वाचा फुटली आहे…तर याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहीत जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून माहीती विचारली असता याप्रकरणी वनरक्षकालाच विचारा असे वेळकाढू उत्तर दिले असल्याने प्रकरणाची व्याप्ती कदाचित मोठी असावी याबाबतही शंका कुशंकांना वाव मिळत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close