

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन आज दि. २६ रोजी माहूर येथे आ. भीमरावजी केराम यांच्या हस्ते करण्यात आली असून डॉक्टरांनी गोरगरीब रूग्णांच्या सेवेत कमी न पडण्याचे आवाहन यावेळी आ. केराम यांनी केले…
देशभरात राबवल्या जात असलेल्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत असून या अभियानाअंतर्गत माहूर येथे आज दि. २६ सप्टेंबर रोजी आमदार भीमरावजी केराम यांच्या उपस्थितीत माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती हळूहळू सुधारत असून येथे गेल्या पाच वर्षात अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या असल्याचे आ. केराम यांनी सांगितले. तर गोरगरीब रूग्णाच्या सेवेत डॉक्टरांनी कमी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले… दरम्यान माहूर न.पं. चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी प्रास्ताविकात केलेली ट्रामा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय उभारणीच्या मागणीला प्रतिसाद देत भविष्यात उपजिल्हा रुग्णालय ट्रामा केअर सेंटर यासह अनेक सुविधा उपलब्ध होणार असल्याने येथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोरगरीब नागरिकांच्या सेवेत कमी पडू नये असे आवाहन केले…

यावेळी रुग्ण कल्याण समितीचे अनिल वाघमारे यांच्यासह नगरसेवक गोपू महामुने, भाजपाचे तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला.. तर अंगणवाडी सेविका, अधीपरिचारिका, परिचारिका, मान्यवर महिलांचा झाडांचे रोपटे देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत सन्मान करण्यात आला. यावेळी रुग्णालयात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कक्षांचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले..
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. किरणकुमार वाघमारे, डॉ. राजाभाऊ गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश माचेवार, डॉ. ओमप्रकाश साबळे, डॉ. अक्षय सांगळे, डॉ. कैलास चव्हाण, डॉ. बिपीन बाबळे, डॉ. अंजली पाटील, डॉ. साईनाथ, डॉ. जाधव यांच्यासह दिडशेवर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अधिपरिचारिका, परिचारिका, कर्मचारी हे शिबिरात आलेल्या हजारो रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होते…










