ईतर

लखमापूर नजीक भरधाव कारने दुचाकीस्वारास उडविले ; एकाचा जागीच मृत्यू….

'धडक बसताच दुचारी तब्बल 200 फुट उडाली ; मृतकाच्या पायाचा टुकडाही गायब..' "सायफळ येथील जयराम मिश्रा यांच्या अपघाती निधनाने शोककळा..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

किनवट/माहूर

नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला लखमापूर नजीक भरधाव कारने दुचाकीस्वारास उडविल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि. ३१ रोजी दुपारी पावनेचारच्या सुमारास घडली असूून या भिषण घटनेमुळे सायफळसह संपुर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे…

 

 

माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर लखमापूर नजीकच्या जग्गू नाईक तांडा व नखेगाव फाट्याच्या दरम्यान आज दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी पावने चारच्या सुमारास माहूर तालुक्यातील मौजे सायफळ येथील जयराम कोमलप्रसाद मिश्रा हे त्यांची दुचाकी क्र. एम. एच. 26 ए. जे. 1589 वरून सायफळ येथे येण्यासाठी वाई बाजारकडे येत होते. त्याच वेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत भरधाव वेगात येणारी एक कार जिचा क्र. एम. एच. 27 ए. आर. 9210 ही जवळपास 120 किमी किंवा त्यापेक्षाही अधीक वेगाने वाई बाजार कडून माहूरच्या दिेेशेने येत होती.. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील जग्गूनाईक तांडा ते नखेगाव फाट्यादरम्यान कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली.. यात दुचाकीवरून येत असलेले जयराम मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला… धडक एव्हढी प्रचंड आणि जोरदार होती की, धडक बसल्याच्या ठिकाणापासून व यातील मृतक जयराम मिश्रा यांच्या मृतदेहापासून दुचाकी ही तब्बल 200 ते 250 फुट समोर फेकल्या गेली. त्याचबरोबर मृतदेहापासून कार देखील काही अंतरावर रोडच्या खाली जाऊन पलटी झाली.. ही घटनास्थळावरील प्रत्यक्ष परिस्थिती असून सदरची कार ही माहूर येथील गुलाबराव आराध्ये यांची असल्याचे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले आहे…..

 

दरम्यान घटनेची माहीती मिळताच माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक चोपडे यांच्यासह सहायक पोलीस निरिक्षक शरद घोडके व त्यांच्या पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळाकडे धाव घेवून मयतास माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविले.. वृत्त लिहीपर्यंत माहूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू असल्याने याबाबतची अधीकची माहीती प्राप्त होवू शकली नाही… परंतू घटनेतील मयत जयरामजी मिश्रा हे अत्यंत सृजनशील, मायाळू व जागरून नागरीक या नात्याने प्रत्येकाच्या सुख दु:खात अत्यंत आपुलकीने सहभागी होत असल्याने त्यांच्या अपघाती निघनाने त्यांचे मुळगाव सायफळ सह संपुर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close