ईतर

वाई बाजार नजीक उभ्या ट्रकला दुचाकीची भिषण धकड ; दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

"तब्बल अर्धा तास तडफडल्यानंतरही वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   वाई बाजार येथील वाघाई टेकडीनजीक राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रकला पाठीमागून दुचाकीच्या भिषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू तर एक लहान मुलगा गंभीर जखमी जखमी झाल्याची घटना आज दुपारी पावनेचारच्या सुमारास घडली असून अपघातानंतर जखमींना कोणत्याही प्रकारची मदत वेळेवर मिळाली नसल्याने तब्बेत अर्धा तास दोन्ही मृतक घटनास्थळावरच अक्षरश: तडफडून दोघांचाही मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले आहे…
 माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर वाई बाजार येथील वाघाई टेकडीनजीक आज दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी पावने चारच्या सुमारास येथील महामार्गावर सारखणीकडे जात असलेल्या परंतू घटनेच्या वेळी उभा असलेला ट्रक ए.पी. 39 यु.एक्स. 6876 या क्रमांकाच्या ट्रकला साईनगर आसोलीवरून वाईबाजारकडे येत असलेल्या दुचाकी क्र. एम.एच. 26 एफ्. 4238 या दुचाकीस्वाराने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विठ्ठल खंडू राठोड वय ३५ वर्षे व एक ६० वर्षीय अनोळखी इसम तसेच विठ्टलचा मुलगा देखील दुचाकीवरून येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले आहे. झालेल्या अपघातानंतर विठ्ठलसह एका ६० वर्षीय अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाला. त्यात विठ्ठलचा मुलगा अर्जुन विठ्ठल राठोड देखील गंभीर जखमी झाल्याने वेदांत समाधान जाधव यांनी सदर मुलाला तातडीने रूग्णालयात पाठवले.. त्यामुळे त्याचा जिव वाचला…
 “विशेष म्हणजे अपघात घडल्यानंतर 108 या क्रमांकावर कॉल करून वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रत्यक्षदर्शीनी बराच वेळ प्रयत्न केला. परंतू कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे दोन्ही मृतक तब्बल अर्धा तास घटनास्तळावर अक्षरश: तडफत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची भावना आहे… शेवटी वैद्यकीय  मदतीअभावी दोघांचा प्राण गेल्याचे मत प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केले आहे…वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close