ईतर

प्राचीन हनुमान मंदीर तुळशी येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा…

'जागृत देवस्थान म्हणून प्रचलित असलेल्या तुळशी येथे भाविकांची अलोट गर्दी..!!'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

 जागृत देवस्थान म्हणून प्रचलित असलेल्या तुळशी येथील प्राचीन हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला असून भाविकांची अलोट गर्दी गर्दीने संपुर्ण परिसरात भक्तिमय वातावरणात हा जन्मोत्सव सोहळा पार पडला.

 आज दि. २ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील मौजे तुळशी येथे अस्तित्वात असलेल्या प्राचीन हनुमान मंदीरात हा हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. तत्पुर्वी ह.भ.प. लचमा महाराज दिसेवार यांच्यासह शामराव महाराज कुमरे, राजे अनमतराव देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी राजे सौ. उषाताई अनंतराव देशमुख (उपसरपंच), मोतीराम मंडाळे, भारत महाजन सतिश ठाकूर, कृष्णा ठाकूर व अनेक मान्यवर भक्तांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी मारूतीरायाचे विधिवत पुजन करून यथोचित दर्शन घेतले.  तद्नंतर पंचक्रोशीतील उपस्थित भाविकांनी मारूतीरायाचे श्रद्धापुर्वक दर्शन घेतले. तर परिसरातील अत्यंत प्राचीन व जागृत मारूती मंदीर म्हणून प्रचलित असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला..
यावेळी मोतीराम मडावी यांच्यासह विठ्ठल सुरेशवार, प्रा. सिताराम मडावी, सुताराम सलाम, मनोहर नागपुरे, सौ. अनिता नागपुरे, सौ. सयाबाई डोके, अशोक सलाम, दिगंबर बरडे, अशोक बरडे, अनिल कुडमते, रामजी आत्राम, सौ. पारूबाई महादेव मंडाळे, सचिन दिसेवार, सौ. गंगाबाई दिसेवार, सौ. अनिता मडावी, सौ. नंदाबाई मंडाळे, आनंदराव कुमरे, दिनेश ठाकूर, सौ. सुमाबाई ठाकूर, मुकुंदा डोके, बंडू पवार, विजय राठोड, प्रभाकर नागपुरे तसेच तुळशीराम आडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close