नोकरी संदर्भ
अष्टपैलू व्यक्तिमत्व ‘नामदेव राठोड’ गुरूजी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात साजरा…!!
"36 वर्षांचा सेवाकाळ यशस्वीरित्या पुर्ण ; पुढील 'इनींग' साठी अनेकांच्या शुभेच्छा..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील करंजी जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख नामदेव राठोड गुरूजी यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला अजून सेवापुर्ती नंतरच्या पुढील कार्यासाठी यावेळी अनेकांनी भरीव शुभेच्छा दिल्या…
माहूर किनवट तालुक्यातील संपुर्ण बंजारा समाजासह अनेकांचे मोडकळीस आलेले संसार जुळवण्याचे प्रेरणादायी व पवित्र कार्य करून जनमानसात आपल्या अष्टपैसूत्व सिद्ध करणारे शिक्षक तथा माहूर तालुक्यातील करंजी जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख नामदेव राठोड यांचा तब्बल ३६ वर्षांच्या शासकीय कर्तव्याला निरोप म्हणून त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा दि. ३१ जानेवारी रोजी वाई बाजार येथील सहारा मंगल कार्यालयात मोठ्या थाटात पार पडला..
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य राजेंद्र केशवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सेवापुर्ती गौरव सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्यासह माजी जि. प. सदस्य संजय राठोड, यवतमाळ जि.प.चे माजी सदस्य अशोक जाधव, दिनकर दहिफळे, माजी पंचायत समिती सदस्य किसन राठोड, उपसभापती अनिल रुणवाल, माजी सभापती शरद राठोड, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, अनिल वाघमारे, डॉ. बाबाराव डाखोरे, प्रल्हाद गावंडे, दत्ता शेरेकर, यश खराटे, निरधारी जाधव, सुशिल जाधव, नामदेव जाधव, विनय राठोड, विठ्ठल आचणे, नरेंद्र जाधव, अनिल महामुने, राजू मुधोळकर (शिक्षण विस्तार अधिकारी), पप्पुलवाड केंद्रप्रमुख हे होते.
दरम्यान ज्योतीबा खराटे यांच्यासह किसन राठोड, डॉ. राजेंद्र चारोडे, अनिल महामुने तसेच प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी नामदेव राठोड गुरूजींच्या तब्बल छत्तीस वर्षाच्या सेवा कार्याच्या कामाचा गौरव आपल्या मनोगतातून करून त्यांना पुढील काळासाठी मंगल कामना दिल्या…. या सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे सुत्रसंचालन अरविंद जाधव यांनी, प्रास्ताविक संजय खडकेकर तर आभार प्रदर्शन शेषराव पाटील यांनी केले……

