वाळू तस्करांनी पळवून नेलेला ट्रॅक्टर माहूर पोलीसांनी केला जप्त…एकास अटक..!
'विदर्भातील फुलसावंगी येथून ट्रॅक्टर व चालकास घेतले ताब्यात...'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वाळू तस्करांनी पळवून नेलेला ‘तो’ ट्रॅक्टर अखेर माहूर पोलीसांनी केला जप्त केला असून आज दि. २३ जून रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विदर्भातील फुलसावंगी येथून ट्रॅक्टरसह चालकास घेतले ताब्यात घेतल्याने माहूर पोलीसांच्या धाडसी कामगीरीचे कौतुक होत आहे…
दि. 19 जून रोजी सकाळी नऊ वाजता माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक बालसिंग ब्राह्मण व संदीप अन्येबोईंनवाड यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी नदीपात्रातून वाळू घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरला अडविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरला परत पैनगंगा नदीतून फुलसावंगी येथे पळवून नेले होते. दरम्यान पोलीस निरीक्षक कराड यांनी तपासचक्र फिरवून फुलसावंगी गावातून ट्रॅक्टरसह चालकाला ताब्यात घेऊन माहूर पोलीस ठाण्यात आणले असून चालकास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे..
“विशेष म्हणजे विदर्भातील काही वाळू तस्कर स्वतःला डॉन समजून वाळू तस्करी करत असल्याची माहिती समोर येत असून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे समोर या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान आहे…तर माहूरचे तहसील कार्यालय मात्र हिंगणी, दिगडी, रुई, हडसणी, वांनोळा, कुपटी, मोहपूर्, सिंदगी या परिसरातील वाळू तस्करावर मेहरबान असल्याने महसूल पथकाकडून भीतीपोटी या ठिकाणी कारवाया होत नसल्याने वास्तव दबक्या आवाजात समोर येत आहे.. परिणामी माहूर पोलीसांनी आपली करडी नजर या भागात वळविल्याने भविष्यात मोठ्या जबरी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट संकेत जाणकार मंडळीकडून मिळत आहेत..

