ईतर
लिंबायत फाट्यानजीक ऑटोची वळूला धडक ; दोन ठार, तीघे जखमी….
"माहूर तालुक्यातील लिंबायत फाट्यानजीकची काल रात्री 7:30 वा. ची घटना"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील लिंबायत फाट्यानजीक ऑटोची वळूला धडक लागून ऑटोतील दोन जण ठार तर तिघे जण जखमी झाल्याची घटना काल रात्री साडेसातच्या सुमारास घडली असून राष्ट्रीय महामार्गावर आटोसमोर अचानकपणे वळू आल्याची बहुधा तालुक्यातील ही पहीलीच घटना असल्याने घटनेबाबत आश्चर्यासह हळहळ देखील व्यक्त होत आहे….
माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील M H 26 T 5390 या क्रमांकाचा ऑटो काल रात्री साडेसातच्या सुमारास माहूर वरून चार प्रवासी घेवून घराकडे निघाला होता. त्यावेळी माहूर ते सारखणी राष्ट्रीय महामार्गावरील मालवाडा घाटाखालगत असलेल्या पेट्रोल पंप ते लिंबायत फाट्याच्या दरम्यान ऑटोसमोर अचानक मोकाट वळू आल्याने त्याला ऑटोची जोराची धडक बसली. या धडकेत ऑटोमध्ये बसलेले छत्रपती नागोराव गवळी वय 26 वर्ष रा. नखेगाव तालुका माहूर याला डोक्याला व छातीला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.. तर रेखा वसंता जाधव हिच्या डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी तिला यवतमाळकडे पाठवले असता तिचाही वाटेतच मृत्यू झाला..


ऑटोतील इतर प्रवासी माधव देवराव गवळी वय 30 रा. नखेगाव, शैलेश गणेश राठोड वय 18 रा. लखमापूर हे गंभीर जखमी झाले असून घटनेनंतर महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी जखमींना तात्काळ माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले.. घटनेची माहिती मिळताच स.पो.नि. शिवप्रकाश मुळे यांच्यासह स.पो.नि. गायकवाड, पो.उप.नि. पालसिंग ब्राह्मण यांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेची नोंद घेत पुढील तपास हाती घेतला आहे…

