क्राइम

सिंदखेड पोलीसांच्या नाकावर टिच्चून वाई बाजारात भरतोय ‘मटका’ बाजार.. ; पोलीस प्रशासनाचा जाणिवपुर्वक कानाडोळा…

"अधिका-यांनाही लाजवेल असा मटका बुकींचा थाट ; अनेक ठिकाणी टेबल सुरू..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  सिंदखेड पोलीसांच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षाने वाई बाजाराचे थेट ‘मटका बाजार बनल्याची प्रचिती येत असून सिंदखेड पोलीसांच्या जाणिवपुर्वक दुर्लक्षाने किंबहुंना पोलीसांच्या नाकावर टिच्चून बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायाकडे पाहता चक्क अधिका-यांनाही लाजवेल असे वास्तव चित्र सध्या वाई बाजारात पहावयास मिळत आहे. 

  राजकीय दृष्ट्या माहूर तालुक्यातील अत्यंत महत्वाचे ठिकाण असलेल्या वाई बाजार परिसरातील वाई हाजारसह अंजनखेड, हरडफ, बोंडगव्हाण, मदनापूर, सारखणी तसेच माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेले माहूरसह पापलवाडी, हिवळणी, आष्टा, लखमापूर व अनेक गावांत  मटका व्यवसाय जोमात आला असून दिवसभर कबाडकष्ट करून केलेली अनेकांची कमाई ‘एक का दस’ च्या लोभापाई मटका बुकींच्या घशात जात असल्याने या व्यवसायातील बड्या माश्यांसह रोजंदारीवर काम करणा-या बुकींवरही कठोर कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर अगदी काही दिवसांपुर्वी बदलून गेलेल्या सिंदखेडच्या ठाणेदाराच्या जागेवर नवीन ठाणेदाराची वर्णी लागल्याच्या संधीचा फायदा घेत मटका व्यावसायिकांना अक्षरश: सुगीचे दिवस नजरेसमोर दिसत होते. अशात वाई बाजार मध्ये ‘न भुतो न भविष्य..ती..’ मटका बुकींचे टेबल थाटले गेले असून खुलेआम सुरू असलेल्या या मटका व्यवसायाकडे पाहता.. नक्कीच सिंदखेड पोलीसांचा “आशिर्वाद”  या व्यवसायास लाभला असावा अशीच एकंदरीत परिस्थिती दिसून येत आहे..

   दरम्यान वाई बाजारसह परिसरात सुरू असलेला ‘मटका’ व्यवसाय कमालीचा फोफावत असतानाच आंबटशौकीनांची हौस भागवण्यासाठी गुटख्याची वाढलेली आवक ऐनवेळी प्रशासनाची झोप उडवण्यासाठी पुरेशी असून सिंदखेड पोलीसांच्या ‘तथास्तू…!!’ मुळे सुरू असेल्या अवैध व्यवसायांने वाई बाजार हे जणू ‘अवैध धंद्यांचा अड्डा’च बनत चालले असल्याची बोलकी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.. त्यामुळे यावर आळा बसवून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व स्पेशल पथके नेमून सुरू असलेले सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असून मटक्याबरोबरच चिडी-फकडी, तिन पत्ती तसेच ऑनलाईन लॉटरीच्या नावाने सुरू असलेले सर्व मटक्याचे व्यवसाय पुर्णपणे बंद व्हावेत अशी रास्त मागणी नागरीकांकडून होत आहे…

“पत्रकारांच्या नावानेही काहींची तगडी वसूली…?”

     “विशेष म्हणजे वाई बाजार येथील सुरू असलेला मटका व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू असताना पोलीसांबरोबरच पत्रकारांनाही हफ्ते द्यावे लागतात असे सांगत एका मटका बुकीकडून दरमहा मोठी रक्कम वसूल केली जात असल्याची गंभीर बाब याच व्यवसायातील एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर उघड केली आहे… त्यामुळे सिंदखेड पोलीसांनी याकडे गांभिर्याने लक्ष देवून हा लांछनास्पद प्रकार तातडीने थांबवावा अन्यथा पुराव्यासह वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी कुणाचीही वाट न पाहता पत्रकारांनाच समोर यावे लागेल असाही इशारा येथील पत्रकारांनी दिला आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close