सामाजिक
सिंदखेड पोलीस ठाण्यात ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा….
"राजकीय पक्षांना मात्र पत्रकार दिनाचा विसर ; पत्रकार संघाकडून जाहीर निषेध"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
पत्रकार दिनाचे औचित्य साधून सिंदखेड पोलिस ठाण्यात सिंदखेड पोलीसांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून केवळ पत्रकारांच्या जिवावर मोठेपण गाजवणा-या तालुक्यातील राजकीय पुढा-यांना मात्र पत्रकार दिनाचा विसर पडल्याने साध्या शुभेच्छा देवून साधी औपचारिकताही पार न पाडणा-या राजकीय पक्षांच्या पुढा-यांचा यावेळी उपस्थित पत्रकार संघाकडून जाहीर निषेध करण्यात आला…
आज दि. ६ जानेवारी रोजी माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्यात आज दर्पन दिन साजरा करण्यात आला. सारखणी येथील जेष्ठ पत्रकार त्र्यंबक पुनवटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले… तद्नंतर सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांनी पत्रकारांचा शाल, पेन व डायरी देवून पोलीस प्रशासनाच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ माहूरचे सचिव जेष्ठ पत्रकार राजकुमार पडलवार यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात राजकीय पुढा-यांचा खरपुस समाचार घेताना… तथापि केवळ बातम्यांच्या माध्यमातून मोठे झालेल्या तालुक्यातील प्रत्येक आंदोलनात्मक घडामोडींच्या निमित्ताने प्रसिद्धीची अपेक्षा बाळगणा-या माकपसह सत्ताधारी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीतील दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गटातील कुण्याही राजकीय पुढा-याकडून कुण्याही पत्रकारास पत्रकार दिनाच्या साध्या शुभेच्छा देखील दिल्या नाही यांची खंत व्यक्त करताना राजकीय पक्षांना केवळ बातम्या छापण्यासाठीच पत्रकारांची आठवण येते का..? असा सवाल उपस्थित करून राजकीय पक्षाच्या संकुचित विचारसरणीचा पत्रकार संघाच्या वतीने यावेळी जाहीर निषेध केला..
…तर सपोनी किनगे यांनीही आपल्या मनोगतातून पत्रकारांच्या प्रती सद्भावना व्यक्त करताना आपुलकी व भावनिकतेचा परिचय दिला.. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष त्र्यंबक पुनवटकर यांनीही आपले विचार व्यक्त केले…
या सत्कार सोहळ्यास जेष्ठ पत्रकार त्र्यंबक पुनवटकर यांच्यासह राजकुमार पडलवार, साजीद खान, बाबाराव कंधारे, संजय सोनटक्के, सुभाष खडसे, दिनेश चव्हाण,अमजद खान पठाण, राजिक शेख, जावेद शेख, अरूण पवार, अमजद खान लालखान, नितीन कन्नलवार, प्रा. प्रविण बिरादार, प्रा. विनोद कांबळे, नितेष बनसोडे, पंकज जैस्वाल, संजय सिद्धेवार, विश्वनाथ पंडागळे, मजहर शेख, जावेद चाऊस, सचिन जाधव, रमेश राठोड तसेच महिला पत्रकार सुरेखा तळनकर व सविता रमेश राठोड यांची उपस्थिती होती…
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष खडसे यांनी, प्रास्ताविक राजकुमार पडलवार तर आभार प्रदर्शन सपोनि सुशांत किनगे यांनी मानले…
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी पो.ह. एच.एस. पठाण यांच्यासह पो.काँ. प्रफुल पवार, गोविंद कदम तसेच महिला पोलीस काँ. माधवी पाटील यांनी परिश्रम घेतले.