सामाजिकनोकरी संदर्भ

मलकागुडा- तुळशी येथे ‘जागतिक महिला दिनानिमित्त ‘आरोग्य शिबीर व बालिका पंचायत’ कार्यक्रम संपन्न..!

'बालिका पंचायत समिती गठीत ; किशोरवयीन बालिका व महिलांना सखोल मार्गदर्शन'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
    मलकागुडा- तुळशी येथे ‘जागतिक महिला दिनानिमित्त ‘आरोग्य शिबीर व बालिका पंचायत’ हा  कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमात किशोरवयीन बालिकांंसह महिलांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले..
   माहुर तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात वसलेल्या तुळशी मलकागुडा या गावात ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने काल (ता. ७ मार्च) रोजी ‘बालिका पंचायत व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून प्रत्येक ग्राम पंचायत अंतर्गत ‘बालिका पंचायत समिती’ गठीत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याची अंमलबजावणी म्हणुन तुळशी येथील सरपंच नितीन मंडाळे, ग्रामसेवक केंद्रे तसेच मलकागुडा ग्राम पंचायतीच्या सरपंच कु. साक्षीताई  आत्राम, उपसरंच सुरेखा कननलवार ग्राम सेवक दिलीप पवार आदींनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले..
  दरम्यान 11 ते 18 वयोगटातील किशोवयीन मुलींच्या शाळेत जाण्याच्या अडी अडचणी, मासिक पाळी जनजागृती, आरोग्य, स्वच्छता, गावातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे, जी. पी. डी. पी. आराखड्यात मुलींना कामे सुचविणे, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देणे, व्यसन मुक्ती, शाळेतील मुलीना चांगल्या गोष्टी, प्लॅस्टिक चें दुष्परिणाम, पौष्टिक आहार, शौचालय इत्यादी कार्य बालिका पंचायत करणार आहे..  यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला, गरोदर, स्तनदा माता, किशोर वयीन मुलींसाठी आरोग्य शिबीर व बालिका पंचायत या उपक्रमास डॉ. वैभव लहाने यांच्यासह डॉ. स्वीटी भोयर, डॉ. सचिन नागपुरे, डॉ. उषा देशमुख, सेवा निवृत्त शिक्षक सीताराम मंडाळे, रवी सलाम ग्रा.पं. सदस्य, मोनिका सलाम, दारू बंदी समितीच्या उपाध्यक्ष रंजना डोके, जि. प. शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक, उपकेंद्र तुळशी चे सर्व कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती. या शिबिराचा लाभ 130 महिला गरोदर स्तनदा माता किशोर वयीन मुलींनी घेतला..
यावेळी ‘बालिका पंचायत कार्यकारिणी’च्या निवडीत चंदा रामराव आत्राम -सरपंच, अनिशा मोतीराम मडावी- उप सरपंच, श्रुती अनिल कुडमते – सदस्य,  करिष्मा सीताराम सलाम, रेशमा महादेव सलाम, आकांक्षा रमेश चहा काटे, ऋतुजा उत्तम पुसनाके, वर्षा सोमजी सलाम, सृष्टी अशोक सलाम यांची निवड करण्यात आली.. सरपंच कु. साक्षी आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला गावचे युवा नेते सुमित भाऊ कन्नलवार यांच्यासह किशोर आत्राम, गजानन पडलवार, श्रीकांत गाडेवर, भारत मडावी, सुरेश सिडाम, ग्रा. पं. सदस्या मंजुषा ताई, गोपाळ उपलेंचवार, अनिता आनंद बोनाडळवर, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, यांची प्रमुख उपस्थिती होती..कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक दिलीप पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close