सामाजिक

जागतिक दिना निमित्त महिलांनी सक्षम होणे गरजेचे – पदमा गि-हे…

"रेणुका मल्टीस्टेट बँकेतही जागतिक महिला दिन साजरा"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर,प्रतिनिधी
  माहूरात अनेक ठिकाणी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून शहरात विविध ठिकाणी या दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून महिलांचा सन्मान करण्यात आला..
   महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत प्रगती लोकसंचालित साधन केंद्र किनवट अंतर्गत माहूर NULM येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षा (सह योगिनी) भाग्यश्री वसंत भगत, प्रमुख पाहुणे पद्मा जयंत गि-हे, एल. डी. चरपिलवार, सुरेखा तळणकर, अर्चना राजू दराडे, निर्मला जोशी, संतोषी माता बचत गट अध्यक्ष वैजंता जाधव, सिद्धी विनायक महिला गट अध्यक्ष योगिता संतोष तामखाने, माला माने वैष्णवी बचत गट अध्यक्षा, पुष्पा प्रभाकर लांडे सविधान बचत गटअध्यक्षा अनुराधा मनोहर कांबळे वैष्णवी बचत गट अध्यक्षा ,सुचिता मनोज राऊत रमाई बचत गट अध्यक्षा ,सुनिता विजय भगत भिमाई बचत गट अध्यक्षा , इरफान बानू खुशबू बचत गट अध्यक्षा यावेळी महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना भाजप महिला आघाडीच्या सौ. पद् मा गि-हे यांनी सखोल मार्गदर्शन करताना महिलांनी सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी एल.डी चरपीलवार यांनीही महिलांना मार्गदर्शन केले..
यावेळी येथील रेणुका मल्टीस्टेट बँकेतही जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close