राजकिय

लिंबायत ग्राम पंचायतच्या महिला सरपंचावर अविश्वास ठराव पारीत…

'५ विरूद्ध २ ने सरपंचावर अविश्वास'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर,प्रतिनिधी
   लिंबायत ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारीत झाला असून कोणतीही माहिती न देता कारभार करत असल्याचा ग्रा. पं. सदस्यांनी ठपका टेवून ५ विरूध्द २ अशा फरकाने हा अविश्वास ठराव पारीत केला..
माहूर तालुक्यातील मौजे ‘लिंबायत-नेर’ हि ७ सदस्यीय गट ग्रामपंचायत असून येथील महिला सरपंचाच्या विरोधात अनेक कारणे दाखवित दि.४ रोजी येथिल ५ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केेला होता. तथापि येथील महिला सरपंच सौ. उज्वला मनोहरसिंग चुंगडे ह्या ग्रामपंचायतचा कारभार मनमानी पद्धतीने करीत असून ग्रा.पं. सदस्यांना विश्वासात न घेता व कोणतीही माहिती न देता कारभार करीत असल्याचा ठपका येथील ग्रा.पं. सदस्यांनी ठेवून दि. ४ रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्या पार्श्वभुमिवर आज दि.११ रोजी तहसीलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेखाली लिंबायत ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेत ५ विरूद्ध २ ने ठराव पारीत करण्यात आला…
    माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत येथील संरपच सौ. उज्वला मनोहरसिंग चुंगडे यांच्या विरोधात सुनील चुंगडे, वैशाली पेडवाल, पृथ्वी बरडे, दिपाली जाधव व कमलाबाई पवार या सदस्यांनी हात उंचावून अविश्वास दर्शविल्याने ५ विरूद्ध २ असा ठराव पारीत करण्यात आला.. या अविश्वास मतदान प्रक्रियेत तहसीलदार किशोर यादव यांच्यासह प्रभू पानोडे, मंडळ अधिकारी कवडे, तलाठी चंद्रकांत बाबर, प्रकाश शेडमाके, ग्रामसेवक कासदेकर यांचे सह सदस्य गावकरी मंडळी उपस्थित होती..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close