नोकरी संदर्भक्राइम

वॉट्सअप ग्रुप वर प्रचार करत आदर्श आचारसंहितेचा’ भंग ; नायगाव पं.स. चा वरिष्ठ सहायक निलंबित…

'निवडणुक काळातील नांदेडमधील पहिली कारवाई..'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

नायगाव-नांदेड/प्रतिनिधी

वॉट्सअप ग्रुप वर प्रचार करत आदर्श आचारसंहितेचा’ भंग केल्याप्रकरणी नायगाव पं.स. चा वरिष्ठ सहायकाला निलंबित करण्यात आले असून नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यरारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या धाडसी कारवाईने कर्मचा-यात एकच खळबळ उडाली आहे…निवडणुक काळातील नांदेडमधील ही पहिलीच कारवाई ठरतली असून नायगाव पंचायत समितीत कार्यरत असलेल्या वरिष्ठ सहाय्यकाला वॉट्सअप ग्रुपवरून प्रचार करणे चांगलेच महागात पडले आहे… 

 

 

नायगाव पंचायत समितीत कार्यपत असलेले यु.एस.धोटे असे निलंबित केलेल्या वरिष्ठ सहाय्यकाचे नाव असून ‘व्हाट्सअप ‘द्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्याने आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ मधील कलम ३ व ४ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे..

 

 निवडणुक काळात निलंबनाची बहुधा ही पहिलीच कारवाई ठरली असून आदर्श आचारसंहितेचा भंग कोणाकडूनही होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close