क्राइम

वाळू माफियाच्या दोन गटात तुफान गोळीबार ; २५ जणांवर गुन्हा दाखल, ४ जणांना अटक

'महागाव तालुक्यातील भोसा घाटावरील थरारक घटना'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   भोसा रेतीघाटावर वाळू माफियाच्या दोन गटात तुफान गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असून या प्रकरणी महागाव पोलिसांत २५ जणांवर गुन्हा दाखल होवून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे…
पैनगंगा नदीक्षेत्रात रेतीमाफियांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असतानाच काल दि. २८ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास महागाव तालुक्यातील भोसा घाटावर रेतीमाफियांच्या दोन गटात तुफान गोळीबार झाल्याची धक्कादायक गटना काल रात्री घडली असून या गोळीबारात तब्बल २५ राऊंड फायर झाल्याचे सांगण्यात येत आहे… सदरची रेतीमाफियांमधील गोळीबाराची थरारक घटना ही रस्त्याच्या कारणावरून झाल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती पुुुढे आली महागाव व आर्णी तालुक्याच्या सिमेवरील साकूर व भोसा या दोन वाळू घाटांवर काल रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली…
   या घटनेत ४ ते ५ टिप्पर, स्विफ्ट डिझायर आणि इतरही दोन वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचेेेही सांगितले जात असून महागाव तालुक्यातील दोन घाटांमधील रस्त्यावरून माफियांमध्ये वाद होवून यात वाळू माफियांच्या दोन गटांकडून फायरींगबरोबरच हाणामारी, दगडफेकीची घटना झाल्याचे  पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.. घटनेची माहिती मिळताच काल रात्री उशिरा पोलीस विभागातील मोठे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर घटनास्थळावरून २ जिवंत काडतुसे व चार रिकामी काडतुसे प्राप्त झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे..याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे पुसदचे गजानन गजभारे, महागाव स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केल्यानंतर सुरेश ढाले यांच्या फिर्यादीवरून हाणामारीतील २५ जणांवर कलम ३०७, ३२४, ३४१, १४३, १४४, १४६, १४७, १४९ सह कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ नुसार विविध कलमा अन्वये महागाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे..
“विशेष म्हणजे विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीक्षेत्रातील महागाव आर्णी तालुक्याच्या दुस-या बाजूच्या किनवट व माहूर तालुक्यातील पैनगंगेच्या वाळूघाटांवर अशाचप्रकारचे वाद असल्याचे दिसून येत असून माहूर तालुक्यातील मौजे सायफळ येथे तहसिल प्रशासनाने घाटावर जाणारा रस्ता बंद केल्याने दुसरीकडून म्हणजेच एका शेतक-याच्या शेतातून रस्ता काढण्यासाठी शेतकरी व रेतीचोरांत झालेल्या वादाची व्हिडीओ क्लिप सध्या माहूर तालुक्यात सोशल मिडीयावर फिरत आहे…त्या व्हिडीओ क्लिप मधील प्रसंग प्रत्यक्षात अवतरल्यास किंबहूंना जर तर चा प्रसंग निर्माण झाल्यास माहूर तालुक्यातील सायफळ येथेही रस्त्याच्या वाद कोणत्याही थराला जाणार यात तिळमात्रही संका नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून प्रशासनाने वेळीच सावध होवून रेतीचोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य बाळगून आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close