
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
२० हजार रूपयाचे आमिष दाखवून विवाहित जोडप्यांचे दुबार, तिबार लग्न लावणा-या माहूर तालुक्यातील पडसा येथील बोगस मेळाव्याच्या बोगसगीरी करणा-या आयोजकावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून मागील २६ वर्षांपासून सुरू असलेल्या धार्मिक विडंबनेची वस्तुनिष्ट चौकशी करावी या मागणीसाठी समाजकल्याण मंत्र्यांसह सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जिल्हाधिकारी व समाजकल्याण अधिका-यांकडे दि.२२ जून रोजी दिलेल्या लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथे मागील २६ वर्षांपासून विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून या मेळाव्यास मागील २६ वर्षांपासून आयोजक चक्क विवाहित जोडप्यांंचेेच दुुुुबार व तिबार लग्न लावत असल्याचा आयोजकाचा पैशासाठीचा फाजिलपणा लक्षात आल्यानंतर अनेक नेतेमंडळींनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. तर काही बेरोजगारांची काही प्रमाणात उपस्थिती अजूनही होती.
विशेेेषत: समाजासाठी कवडीचेही काम नसलेल्या आयोजकाला “आमदार झाल्यासारखं वाटतंय…!” या अविर्भावात वावरत असला तरी मागील २६ वर्षांपासून बोगस मेळाव्याचे आयोजन करून समाजाची दिशाभुल व शासनाची लुटमार करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय राज्यघटना व कायद्याला सर्वोच्च स्थानी मानत असलेल्या समाजबांधवाची एक मोठी फळी संबंधित बोगसगीरी करणारा आयोजक व त्याच्या रोजंदार सेनेविरूध्द एकवटली आहे…
याचेच फलित म्हणजे माहूर येथील ज्वलंत आंबेडकरी विचारवंत तथा सामाजिक कार्यकर्ते आकाश रमेश कांबळे यांनी दि.२२ जून रोजी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड यांच्यासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी नांदेड व समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे लेखी तक्रार देवू समाजाची बदनामी व शासनाची दिशाभुल करणा-या बोगस मेळाव्याचे आयोजक प्रकाश नारायण गायकवाड व रमामाता महिलामंडळ पडसा यांच्यामार्फत आयोजन करण्यात आलेल्या मागील २६ वर्षाच्या सर्व मेळाव्यांची वस्तूनिष्ट चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे….
निवेदनातून केलेल्या मागण्यांत प्रामुख्याने…
1) आयोजक प्रकाश नारायण गायकवाड व रमामाता महिलामंडळ, पडसा यांचेकडून मागील २६ वर्षात शासनाची लुबाडणुक करून जमा केलेले करोडो रूपये वसूल करा….
2) दि. २९ मे २०२२ रोजी झालेल्या मेळाव्याची चौकशी समिती नेमून वस्तूनिष्ट चौकशी करा….
3) सर्वांवर योग्यती दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करा….
यासह २० हजार रूपयाचे आमिष दाखवून दुबार, तिबार लग्न लावून विवाह मेळाव्यासंदर्भातील शासनाच्या मुळ उद्देशाला हरताळ फासणा-या, व फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश करावा. तसेच या गोरखधंद्याला उजागर करून समाजाची व तालुक्याची बदनामी थांबवावी.. अन्यथा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील समाजबांधवातर्फे विविध आंदोलने करण्याचा इशाराही लेखी निवेदनातून आकाश कांबळे यांनी दिला आहे…
“विशेष म्हणजे २२ मे रोजी माहूर तालुक्यातील आष्टा येथे संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात विवाहबध्द झालेले जोडपे थेट विवाह मेळाव्यात दिसले. तर प्रहार मार्फत सामाजिक बांधिलकी जपत एका अपंग जोडप्याचा विवाह लावण्यात आलेले ‘ते’ जोडपेही याच विवाह मेळाव्यात दुस-यांदा बोहल्यावर चढले.. एवढेच नव्हे तर तालुक्यातील अनेक गावातील चालू वर्षात व मागील वर्षी लग्न झालेले अनेक जोडपे या विवाह मेळाव्यात दुस-यांदा विवाहबध्द झाली असल्याचे नाटक करण्यात आले. ही बाब आयोजकांसाठी लाजिरवाणी असली तरी पैशासाठी त्यांची नितीमत्ता प्रदर्शित करणारी आहे…त्यामुळे या विवाह मेळाव्याची वस्तुनिष्ट चौकशी झाल्यास लुचाट व स्वयंघोषित नेत्याचे पितळ सर्वासमोर उघडे पडत आहे…”त्यातही खासन् खास बाब म्हणजे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणा-या वास्तव बातम्या आमच्या माध्यमांवर निर्भिड व बेदरकारपणे प्रकाशित होत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत असलेला आयोजक रागाने करपून जात असला तरी स्वत:चे कर्म हे माध्यमाच्या आरश्यात दिसू नये यासाठी माध्यम प्रतिनिधींना बातमी न छापण्यासाठी अनेक प्रकारची प्रलोभणे देत असल्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे अनेक माध्यम प्रतिनिधींकडून सांगण्यात आले आहे. यासाठी माहूरात नव्यानेच वैद्यकीय व्यवसायात उतरलेल्या एका नवशिख्या डॉक्टरकडून माध्यम प्रतिनिधींची मनधरणी करण्यासाठी जिवाचे रान केेेले जात असल्याची ऑडीओ क्लिप देखील प्राप्त झाली आहे… (योग्य वेळी ती क्लिप जरूर प्रकाशित करण्यात येईल.) तर मेळाव्याचे सत्य उजागर करणा-या माध्यम प्रतिनिधींनाही आम्ही बघून घेऊ.., मुळीच सोडणार नाही… अशा स्वत:चीच “डांग” फोडून घेणा-या धमक्याही अनेकांजवळ दिल्या असल्याचे समजते….

