माहूर तालुक्यातील चारही परिक्षा केंद्रांवर ‘बारावी परिक्षा’ सुरळीत सुरू….
"एकूण ११६९ पैकी ११५७ विद्यार्थी उपस्थित ; १२ अनुपस्थित"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी यंदाच्या बारावीची परिक्षा तालुक्यातील चारही परिक्षा केंद्रांवर सुरळीत सुरू असून आज पहिल्या दिवशी एकूण ११६९ पैकी ११५७ परिक्षार्थी हजर तर सर्व केंद्रावरील १२ परिक्षार्थी गैरहजर असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे…
आज परिक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला अनुक्रमे परिक्षा केंद्र क्र. २२५ रेणूकादेवी महाविद्यालय माहूर येथील केंद्रावर एकूण २१० विद्यार्थ्यापैकी २०७ विद्यार्थी परिक्षेस हजर असून ३ विद्यार्थी परिक्षेस गैरहजर आहेत.. येथीलच परिक्षा केंद्र क्र. २२६ जगदंबा विद्यालय माहूर येथील परिक्षा केंद्रावर एकूण १८८ विद्यार्थ्यांपैकी १८६ विद्यार्थी परिक्षेस हजर असून २ विद्यार्थी गैरहजर आहेत.. परिक्षा केंद्र क्र. २२७ शंकरराव चव्हाण विद्यालय आष्टा येथील केंद्रावर १८९ पैकी १८९ असे शंभर टक्के विद्यार्थी परिक्षेस हजर असून तालुक्यात सर्वात मोठे परिक्षा असलेले केंद्र क्र. २२८ अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एकूण ५८२ परिक्षार्थींपैकी ५७५ परिक्षार्थी हजर तर ७ परिक्षार्थी गैरहजर आहेत… तर याच ठिकाणी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांच्यासह एनपीसी रघुनाथ मडावी आपल्या पोलीसी फौजफाट्यासह चोख बंदोबस्त ठेवून आहेत…
एकंदरीतच तालुक्यातील चारही परिक्षा केंद्रावर एकूण ११६९ परिक्षार्थींपैकी ११५७ जण परिक्षेस हजर तर १२ जण गैरहजर असल्याची माहिती तालुका परिरक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाली असून वरील चारही परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. व सर्व ठिकाणी सुरळीत परिक्षा पार पडाव्यात यासाठी तालुका परिरक्षक तथा गटशिक्षण अधिकारी आर. एल. मुधोळकर यांच्यासह सहाय्यक परिरक्षक एस.एस. पाटील हे उत्तम नियोजन करीत असल्याचे दिसून येते…

