क्राइम
बातमीचा राग मनाशी धरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अवैध धंदेवाईकांवर कडक कारवाई करा….
"वाई बाजार येथे घडलेल्या घटनेसंबंधी पत्रकारांच्या शिष्टमंडळाकडून लेखी निवेदनाद्वारे मागणी"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
ड्राय डे च्या दिवशी विकल्या जाणा-या अवैध दारूसंबंधाने बातमी प्रकाशित करून जिव मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबंधितावर कार्यवाही करून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी सिंदखेड पोलीस ठाण्यात पत्रकारांनी लेखी निवेदन देण्यात आले असून संबंधित अवैध धंदेवाईकावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे..
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ शाखा माहूरचे सदस्य तथा बाजार येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पत्रकार कैलाश बेहेरे यांनी दि. ३० जाने. (म. गांधी पुन्यतिथी) रोजी ड्राय डे च्या दिवशी वाई बाजार येथे देशी दारू दुकान परिसरात विक्री होत असलेल्या नियमबाह्य देशी दारू विक्रीच्या संबंधात बातमी प्रकाशित केली होती. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला देवून सिंदखेड पोलीसांनाही याबाबत अवगत केले होते. तथापि दि. ३१ रोजी दैनिक ‘श्रमिक लोकराज्य’ या वृत्तपत्रांमध्ये “ड्राय डे च्या दिवशी दारूची बेफाम विक्री” या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्तांकनात वाई (बाजार) येथे देशी दारू दुकानातच नव्हे तर अनेक पान टपरीवर सुद्धा मिळते हा उल्लेख केला होता. त्यामुळे सदर बातमीचा राग मनाशी धरून पान टपरी च्या आड अवैध दारू विकणा-या इसमाने मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी आठवडी बाजाराच्या दिवशी भर चौकात गाठून … “आमचे विरुद्ध बातमी का लावली.?, यापुढे लावली तर घरात घुसून जीवानिशी मारू अशी खुलेआम धमकी बेहेरे यांना दिली होती…
दरम्यान बातमीचा राग मनात धरून बेहेरे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणा-या इसमांवर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी आज दि. ६ रोजी पत्रकार कैलाश बेहेरे यांच्यासह अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ शाखा माहूरचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी, संघटनेचे सचिव राजकुमार पडलवार, गजानन भारती, राज ठाकूर, बाबाराव कंधारे, सुभाष खडसे, सिद्धार्थ तामगाडगे, साजीद खान, अमजद पठाण, अमजद खान, राजकिरण देशमुख, डॉ. जयप्रकाश द्रोणावार, अरूण पवार, जावेद शेख, इद्रिस शेख, प्रविण बिरादार आदींच्या स्वाक्ष-या असलेले निवेदन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांना दिले असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.. निवेदण्याच्या प्रति जिल्हा पोलीस अधिक्षक नांदेड यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांनाही देण्यात आल्या आहेत….

