ईतर
पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सर्वतोपरी संरक्षण देणार…. !!
"सिंदखेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपोनि. जाधवर यांचे अभिवचन..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
समाजातील असमाजिक तत्वांशी लढा देत समाजाच्या उन्नत्तीसाठी लेखणी झिजवणा-या पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सर्वतोपरी संरक्षण देणार असून पत्रकारांनी प्रशासनाच्या चांगल्या गोष्टींची वाहवा करण्यापेक्षा उणीवांवर भर देवून लिखान करण्याचे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सपोनि जाधवर यांनी सिंदखेड येथे पत्ररारांशी संवाद साधताना केले….
आज दि. ६ फेब्रुवारी रोजी वाई बाजार येथील एका प्रकरणात बातमीचा राग मनात ठेवून पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी देणा-या अवैध व्यावसायिकाविरोधात कार्यवाहीच्या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ माहूरचे शिष्टमंडळ सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश जाधवर यांची भेट घेवून संबंधित अवैध धंदेवाईकावर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी गेले असताना सपोनि. जाधवर यांनी हे अभिवचन दिले..

“लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचे कर्तव्य बजावत असतान पत्रकार आपल्या लेखणीद्वारे समाजातील दबक्या घटकांना न्याय देवून त्यांच्यावरील अन्याय उजागर करण्याचे कर्तव्य बजावत असतो… अशावेळी प्रसंगी पत्रकारांवर अनेकवेळा खोट्या गुन्ह्यांची नोंद करून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही… या प्रकाराशी मी मुळीच सहमत नसून पत्रकारांच्या लेखणीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखणे ही काळाची गरज आहे.. त्यामुळे पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांच्या लिखाणस्वातंंत्र्याला संरक्षण देणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले…
“विशेष म्हणजे सरकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना चांगले काम करत असेल तो एक त्याच्या कर्तव्याचा भागच असतो..शिवाय त्या कामासाठी त्याला मोबदलाही मिळत असतो. अशात त्याच्या चांगल्या कामासाठी प्रसिद्धीची गरज नाही.. परंतू तोच अधिकारी जर कर्तव्यात कसूर करत असेल आणि निश्चितच त्याच्या कर्तव्यात काही उणिवा असतील तर पत्रकारांनी निश्चितच आपल्या लिखाणातून त्या बाबी समोर आणाव्यात… एकंदरीतच चांगल्या कार्याची वाहवा करण्याऐवजी पत्रकारांनी कामचुकार धोरणाचा गवगवा करून अधिका-यांना वठणीवर आणावे…या मी मताचा असल्याचेही सपोनि जाधवर यांनी सांगितले….

