क्राइम
सायफळ लूट प्रकरणातील फरार असलेसे ‘ते’ दोन आरोपीही सिंदखेड पोलीसांच्या ताब्यात..
"अटक आरोपी ''गांजा गँग' म्हणूनही गावात कु-प्रसिध्द"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
बहुचर्चित बचतगट कर्मचा-याच्या मारहाण व लुट प्रकरणात एका बालकासह चौघांना अटक केल्यानंतर फरार असलेले दोघांनाही आज सिंदखेड पोलीसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे…
माहूर तालुक्यातील सायफळ येेेेथील बहुचर्चित लूट प्रकरणी काल दि. ६ रोजी एका विधीसंघर्षीत बालकासह चौघांना ताब्यात घेवून त्यातील तिघांना सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर काल रात्री उशीरा फरार असलेले समाधान दत्ता शेंडे वय ३१ वर्षे व करण वसंता शेंडे १९ हे दोघे फरार आरोपी स्वत: सिंदखेड पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.. दरम्यान वरील दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून यातील सर्वच आरोपीं सिंदखेड पोलीसांच्या ताब्यात असल्याने परिसरातील अनेक जबरी चो-या तसेच घरफोड्यांचा खुलासा होणार असल्याची शक्यता सायफळ वासियांकडून वर्तवण्यात.येत आहे…
“विशेष म्हणजे सायफळ गावातील जाणकार मंडळींकडून प्राप्त माहितीनुसार प्रकरणातील दोषी मंडळी ही ‘गांजा गँग’ म्हणून प्रसिध्द असून मोठ्या प्रमाणात नशेखोरीच्या आहारी गेल्याचे सायफळ गावात खुलेआम चर्चा आहे.. तर सदरचा गुन्हा उघडकीस येण्यापुर्वीदेखील गावात अनेक चो-या तसेच घरफोड्या झाल्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे..त्यामुळे सदर प्रकरणातील आरोपीतांकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सिंदखेड पोलीसांनी प्रकरणाच्या मुळाशी जावून अजून काही गुन्हे निष्पन्न होतात काय याबाबत सकारात्मक प्रयत्न करावेत. अशी माफक अपेक्षा सायफळवासी बाळगून आहेत…

