ईतर
गोकुळ येथे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; महसूल पथकाची धाडसी कारवाई
'तहसीलदाराच्या बदलीने रेतीचोर सक्रीय ; रेतीतस्करांची नांगी ठेचण्यास महसूल प्रशासनही सज्ज...

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तहसीलदाराची बदली झाल्याच्या पार्श्वभुमिवर तालुक्यातील रेतीतस्कर सक्रीय झाले असून काल दि. १ रोजी रात्रीच्या सुमारास गोकुळ येथे अवैध रेती वाहतुक करणा-या एका ट्रॅक्टरवर धाडसी कारवाई करत रेतीचोरांच्या मुसक्या आवळण्यास महसूल प्रशासन सज्ज असल्याचे महसूल पथकाने दाखवून दिले आहे…
काल दि. १ रोजी माहूर तालुक्यातील गोकुळ नगर येथे रेतीची चोरीच्या मार्गाने वाहतुक सुरू असल्याची कुणकुण महसुल पथकाला लागली. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथू यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कैलाश जेठे उर्फ महाकाल, मंडळ अधिकारी शंकर चंदनकर, तलाठी अभिजीत कुडमते, तलाठी सी. पी. बाबर, तलाठी साहेबराव गावंडे, तलाठी दुर्योधन मॅडम, कोतवाल सागर हिवाळे, दीपक लोखंडे, लक्ष्मण मेश्राम, विष्णू देवारे यांच्या पथकाने रात्रीच्या अंधारात काठीच्या साह्याने पाण्याचा अंदाज घेत नदीपलीकडून येत असलेल्या ट्रॅक्टरला पकडले. अशाच कारवाया यापुढेही सुरूच राहतील असेही नायब तहसीलदार जेेठे यांनी सांगितले आहे…
दरम्यान पकडण्यात आलेले ट्रॅक्टर माहूरच्या तहसील कार्यालयात जमा केले असून कारवाईबाबतची पुढील प्रक्रीया सुरू असल्याचे कळते…

