क्राइम
सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेची गळफास घेवून आत्महत्या ; दहेली येथील दुर्दैवी घटना…
"दोन महिलांसह सिंदखेड पोलीसांत चौघांवर गुन्हा दाखल ; दोघे अटकेत, 2 दिवसांची पोलीस कोठडी"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
सासरच्या मंडळीकडून हुंंड्यासाठी होत असलेल्या सततच्या त्रासास कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना दि. १ रोजी दहेली येथे घडली असून याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल होवुन दोघांना पोलीसांनी अटक केली आहे…
सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे दहेली ता. किनवट येथील दि. १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास तेजस्वीनी नामक विवाहितेने तिच्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी मयताचे वडील सुरेश गावंडे रा. पडसा ता. माहूर यांनी सिंदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. १/२६ कलम 80(2), 85, 108, 3(2) भारतीय न्याय संहिता अन्वये सचिन सतिश काळे, सतिश शामराव काळे, ज्योती सतिश काळे व तृप्ती पियुष बोबडे रा. वलगाव ता.जि. अमरावती या आरोपीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सचिन काळे तसेच सतिश काळे यांंना पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान अटक आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची म्हणजेच सोमवार पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे… प्रकरणाचा तपास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आर. बी. जाधवर हे करीत आहेत….





