ईतर
१ जुलै रोजीची वृक्षलागवड म्हणजे माहूर वनविभागाचा ‘फुसका बार’….!
"तुळशी वगळता तालुक्यात कुठेही वृक्षलागवड नाही"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
माहूर वनपरिक्षेत्रांतर्ग १३ हजार ६१७.९८१ हेक्टर वनपरिक्षेत्र असताना त्यातील ३५ हेक्टरवर वृक्षलागवडीचा संकल्प करून मोठमोठ्या गप्पा झाेडणा-या माहूर वनपरिक्षेत्र अधिका-यांचा काल दि. १ जुलै रोजीचा वृक्षलागवडीचा संकल्प म्हणजे निव्वळ फुसारक्या व फुसका बार असल्याचे सिध्द झाले असून तालुक्यातील केवळ गोंडवडसा (तुळशी) वगळता एकाही ठिकाणी वनविभागातर्फे जाहीर करण्यात आलेली वृक्षलागवड करण्यात आली नसल्याची गोपनीय माहीती समोर आली आहे..
वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांच्यामार्फत मागील महिण्यात आघाडीच्या वृत्तपत्रांमधून मोठ्या प्रमाणात वृत्त प्रकाशित करून १ जुलै रोजी वनपरिक्षेत्रांतर्गत ३५ हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागड करण्याचा संकल्प वृत्तपत्रांमधून मांडला होता. तर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या संत तुकारामांच्या अभंगवाणीला आपले ब्रिदवाक्य बनवल्याची बतावणी करत असलेल्या माहूर वनविभागाने वृक्षारोपनाचा भरगच्च कार्यक्रम आखल्याच्याही ‘हातहातभर’ बातम्या आघाडीच्या वृत्तपत्र व माध्यमांतून वाचायला मिळाल्या.. त्यावेळी “कोट्यावधींची कामे दडवून बसलेल्या वनविभागाकडून वृक्षलागवडीच्या फुशारक्या..!” या मथळ्याखाली आमच्या माध्यमाने वृत्त प्रकाशित करून वनविभागाकडून केवळ प्रसिध्दीसाठी दिलेल्या त्या बाबीची पोलखोल केली होती…
दरम्यान सदर प्रकरणाता मोठ्या प्रमाणात वनविभाग कार्यान्वित होवून वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलेली जाहिरातबाजी व प्रसिध्दीने संकल्पापेक्षाही अधिकची कामे करेल ही अपेक्षा वनप्रेमी बाळगून असताना…. काल दि. १ जुलै रोजी माहूर कार्यालयात केवळ एकच कर्मचारी हजर होता. त्यावेळी वनपरिक्षेत्रांंतर्गत झालेल्या वृक्षलागवडीची माहीती विचारण्यासाठी माहूर येथील ‘अलि’नामक कर्मचा-यास भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता या कामाची माहीती माझ्याकडे नसून याची संपुर्ण माहीती ही साहेबांकडे असल्याचे त्यांनी सांगताच… वनपरिमंडळ अधिकारी महोदय रामकृष्ण आगळे यांना आम्ही सलग तिन वेळा संपर्क करूनही कॉल रिसिव्ह करण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही… त्यामुळे शेवटी आम्ही वनपरिक्षेत्र अधिकारी रोहीत जाधव यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी बाहेर असल्याचे सांगीतले… त्यावेळी वृक्षलागवडीबाबत आकडेवारीची माहीती वृत्तांकनासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केल्यानंतर त्यांनीही माहीती पाठवतो असे सांगून तात्पुरती वेळ मारून नेली…
परंतू प्रत्यक्षात मात्र अद्यापही केलेल्या लागवडीची अधिकृत माहिती वनविभागाकडून देण्यात आली नसून प्राप्त माहितीनुसार फक्त गोडवडसा (तुळशी) येथील ३५ झाडे वगळता वनविभागाकडून ३५ हेक्टरवर वृक्षलागवड हा माहूर वनविभागाचा संकल्प निव्वळ ‘फुसका बार’ असल्याचे दिसून येत आहे. तर सध्या वनपरिक्षेत्रांतर्गत १ कोटी १२ लाख ८१ हजार रूपयाच्या ३२ कामांपासून नागरिकांचे लक्ष हटवण्यासाठी हा नियोजनाचा भाग असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे…..

