ईतर

भ्रष्टाचाराने बरबटलेल्या माहूर वनविभागाच्या बोगस कामांची स्थळपाहणी करून दोषींवर कारवाई करा…

"जिल्हा नियोजन समितीसह संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल होणार..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

(बाबाराव कंधारे)

भ्रष्टाचाराने बरबटलेल्या माहूर वनविभागाकडून केवळ कागदोपत्री, थातूरमातूर स्वरूपात केलेल्या तसेच कामेच न केलेल्या तालुक्यातील ३२ ठिकाणच्या कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून दोषींवर कडक कारवाईसाठी माहूर तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते पुढे सरसावले असून जिल्हा नियोजन समितीसह वनविभाग व संबंधित ठिकाणी लवकरच ऑनलाईन व ऑफलाईन लेखी तक्रारी दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहीती प्राप्त झाली आहे.

भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या माहूर वनविभागास तालुक्यातील ३२ ठिकाणच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाचा १ कोटी १२ लाख ८१ हजार रूपयाचा निधी प्राप्त आहे. तर हा निधी अनेक दिवसांपासून जसाच्या तसा दाबून ठेवलेल्या वनविभागाने काही जागरूकांच्या डोळ्यांत धुळफेक करण्यासाठी यातील काही ठिकाणी थातूर मातूर स्वरूपाची कामे केली आहेत. तर बहुतांश ठिकाणी कामेच केली नसून प्रस्तावित कामे पावसात वाहून जाण्याची वाट पाहिली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तालुक्यातील अनेक ठिकाणी वेळ, मजूर तसेच निधी देखील हातावर असताना देखील वनपरिक्षेत्र अधिका-यांनी संबंधित ठिकाणी कामेच सुरू केली नाहीत..! हे न उलगडणारे कोडे असून संपुर्ण उन्हाळ्याची वेळ निघून जात असताना तसेच मजूर, वेळ व निधीही हातावर असताना ही कामे का करण्यात आली नाही..? हा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे…

    “विशेष म्हणजे माहूर वनविभागाच्या या सावळ्या गोंधळात भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचा-यांची एक मोठी साखळी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून यातील सत्यता बाहेर पडावी.. तसेच ‘गरीब गाय’ म्हणून तालुक्यातील जनतेसमोर आपली “छबी” प्रस्तुत करणा-यांंचा खरा चेहेरा सर्वांसमोर आणण्यासाठी अनेकजण सध्या कागदपत्रांसाठी माहूर वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या कार्यलयाचे उंबरठे झिजवत असून माहूर वनपरिक्षेत्र अधिका-यांकडून नियोजनबध्दरित्या दडवून ठेवलेल्या कामांचे गुपीत लवकरच सर्वांसमोर येणार आहे…

 

यासाठी वन विभागातील कामे करण्यात आलेल्या गावातील मातब्बर मंडळींचे एक शिष्टमंडळ लवकरच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्यासह अशोकरावजी चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेवून बोगस कामांच्या पुराव्यासह लेखी तक्रार दाखल करण्यार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीजवळ अनेकांनी बोलून दाखवली आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close