नोकरी संदर्भक्राइम
‘मेट’ येथील “त्या” अवैध वृक्षतोडीची माहूर वनविभागाकडून तातडीने दखल……
"वृत्त प्रकाशित होताच अवघ्या काही वेळात जायमोक्यावर धडक ; विविध जातींची तब्बल ३९ खोडे जप्त....!"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
‘मेट’ येथील “त्या” अवैध वृक्षतोडीसंदर्भातील वृत्ताची माहूर वनविभागाने तातडीने दखल घेतली असून वृत्त प्रकाशित होताच अवघ्या काही वेळात तातडीची पावले उचलत प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर होवून विविध जातींची तब्बल ३९ खोडांची नग वनकर्मचा-यांनी जप्त करून पुढील कारवाई प्रस्तावित केल्याने निसर्गप्रेमी मंडळीकडून समाधान व्यक्त होत आहे….
माहूर तालुक्यातील मौजे मेट परिसरात मेट ते उमरा रस्त्यालगत दक्षिण ते उत्तर वाहणा-या नाल्यानजीकच्या एका शेतात अवैध लाकूडतोडे विनापरवाना प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करून त्या लाकडाची छुप्या मार्गाने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती आज दि. १२ मार्च रोजी आमच्या वृत्तवाहिनीला प्राप्त झाली होती… त्या गोपनीय माहितीची खातरजमा करून नेमके सत्य काय..? ते शोधण्यासाठी आज दि. १२ रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास आमच्या वृत्तवाहिनीने प्रत्यक्ष जायमोक्यावरील परिस्थितीचा आढावा घेेेेतला होता… त्यानंतर प्रत्यक्ष दर्शनी माहितीच्या आधारावर….. ‘मेट’ सह संपुर्ण माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात तुफान वृक्षतोड….”तोडलेले लाकूड मोठ्या प्रमाणात जमा ; विभागाकडून परिस्थिती न दिसल्याचा आव..” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.. त्या वृत्ताची तातडीने दखल घेत माहूर वनविभागाचे वनररिक्षेेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे अधिनस्त कर्मचारी वनपाल मीरसय्यद अली यांच्यासह वनरक्षक दीपक माने व इतर कर्मचा-यांनी अवघ्या काही वेळात घटनास्थळावर हजर होवून परिस्थितीची पाहणी केली असता विविध जातींच्या लाकडी खोडांचे तब्बल ३९ नग दिसून आले… दरम्यान पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा करून सर्व नग वनविभागाकडून जप्त करण्यात आले असून याबाबतची पुढील कारवाई प्रस्तावित केली आहे….
वनविभागाकडून केलेल्या कारवाईचे निसर्गप्रेमी मंडळीकडून स्वागत करण्यात येत असून आजच्या कारवाईप्रमाणेचे तालुक्यात इतर ठिकाणीही असलेले अवैध लाकूडसाठेही अशाच प्रकारे जप्त करून कारवाई करावी.. त्यासोबतच तालुक्यातील सर्व वनविभागाच्या नाक्यांवर बारीक लक्ष ठेवून छुप्या मार्गाने होत असलेल्या लाकूड तस्करीवर माहूर वनविभागाने आळा बसवावा अशी माफक अपेक्षा वनप्रेमी मंडळी बाळगून आहे…