ईतरसामाजिक

माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी पत्रकार दिन उत्साहात साजरा…

"सिंदखड पोलीस ठाण्यासह माहूर पोलीस ठाणे व नाभिक समाजबांधवांकडून पत्रकारांचा सन्मान...!" राजकीय पक्षांना मात्र पत्रकार दिनाचा विसर....

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

       पत्रकार दिनाचे औचित्य साधून माहूर तालुक्यातअनेक ठिकाणी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून सिंदखेड पोलिस ठाण्यासह माहूर पोलीस ठाणे तसेच नाभिक समाजबांधवांंच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र पत्रकारांच्या जिवावर मोठेपण गाजवणा-या तालुक्यातील राजकीय पुढा-यांना मात्र पत्रकार दिनाचा विसर पडल्याने साध्या शुभेच्छा देवून औपचारिकता देखील पार न पाडणा-या राजकीय पक्षांच्या पुढा-यांचा कामचलाऊ धोरणाविरोधात पत्रकार बांधवांत नाराजीचा सूर पहावयास मिळाला… 

    काल दि. ७ जानेवारी रोजी माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्यात दर्पन दिन साजरा करण्यात आला. यावेळी माहूर येथील जेष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांच्यासह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष सरफराज दोसानी व तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले… यावेळी तद्नंतर सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांनी पत्रकारांचा शाल व पेन व देवून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. 
त्याचप्रमाणे माहूर पोलीस ठाण्यात माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरन भोंडवे यांच्यासह पोलीस निरिक्षक गणेश चोपडे व सहायक पोलीस निरिक्षक शरद घोडके यांच्या हस्ते पत्रकारांंचा सन्मान करताना पेन व डायरी देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी किरन भोंडवे, पोलीस निरिक्षक चोपडे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार विनोद कांबळे यांनी, प्रास्ताविक पो.नि. चोपडे यांनी तर आभार सपोनि. शरद घोडके यांनी मानले.. यावेळी तालुक्यातील अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.
 
त्याचप्रमाणे महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा माहूरच्या वतीने माहूर येथील कपिलेश्वर मंदीर परिसरात दर्पन दिन अर्थात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांचा नाभिक समाजबांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्याबरोबरच उपस्थित पत्रकार बांधवांचाही सन्मान करण्यात आला. जेष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी यांच्यासह सरफराज दोसानी, जयकुमार अडकीने आदींंनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले तर नाभिक समाज माजी तालुकाध्यक्ष जगदीश रामभाऊ वडसकर यांचा समाजाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला पत्रकार तथा नाभिक मंडळाच्या महिला तालुका अध्यक्षा सुरेखाताई बालाजी तळनकर  यांनी केले. यावेळी पुरुष तालुका अध्यक्ष सुरेश गोविंद शिन्दे यांच्यासह ता. उपाध्यक्ष बबन नागोराव पोलसवार, ता. सचिव गंगना तुकाराम पोलसवार, ता. कार्याध्यक्ष विलास नानाजी राऊत, ता. सहसचिव बालाजी तळणकर ता. सल्लागार जगदीश वडसकर, तालुकाध्यक्ष सुरेश (बाळू) शिंदे, शहरअध्यक्ष राहुल दिपकराव राऊत, उपाध्यक्ष अंकुश बालाजी शिंदे, सचिव प्रदीप शेरकुरवार, सहसचिव विनोद लिंग्नवार, कोषाध्यक्ष आकाश शिंदे, बाळू चिल्लेकर तसेच मार्गदर्शक बाबारावजी चिल्लेकर यांची उपस्थिती होती… 
“विशेष म्हणजे केवळ आणि केवळ पत्रकारांच्या लेखणीच्या बळावर लिडरक्या गाजवणा-या तालुक्यातील राजकीय पुढा-यांना मात्र दर्पन दिन अर्थात पत्रकार दिनाचा विसर पडल्याने प्रसंगी “भाऊ बातमी लावा हो….!” म्हणून विनवण्या करणारे पुढारी मात्र पत्रकार दिनाच्या निमित्ताने अज्ञातवासात गेल्याने प्रत्यक्ष तर सोडाच परंतु समाजमाध्यमांवरून देखील पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याने राजकीय पुढा-यांच्या कामचलाऊ धोरणाचा पत्रकार बांधवांत नाराजीचा सुरू पहावयास मिळाला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close