ईतर

सारखणी–मांडवी रस्त्यावर भीषण अपघात ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर….

"सारखणी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील घटना..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

किनवट/माहूर

   सारखणी–मांडवी रस्त्यावरील अपघाताची मालिका सुरूच असून काल दि. २५ जाने. रोजी रात्रीच्या सुमारास मॅक्स पिकअप व दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना सारखणी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील वॉटर फिल्टर नजीक ही घटना घडली… 

 

 

काल दि. २५ जानेवारी रोज रविवारची सायंकाळी साडेआठच्या सुमारास सारखणी ते मांडवी रस्त्यावर मॅक्स पिकअप आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत लिंगी येथील दिगंबर मारोती बावणे (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा सहकारी तुळशीराम गंभीर जखमी झाला आहे… दरम्यान दुचाकीस्वार दिगंबर बावणे हे आपल्या सहकाऱ्यांसह दिग्रस कान्हा येथे वधू मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.व्ही.7083 वरून ते लिंगीकडे परतत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मॅक्स पिकअप क्रमांक एम.एच.27 झेड.5701 ने जोरदार धडक दिली.. या धडकेत दिगंबर बावणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातानंतर रस्त्यावर अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता. त्यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती..  दुचाकीवरून प्रवास करीत असलेले सहप्रवासी तुळशीराम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष ठोंबरे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथील रिम्स हॉस्पिटलकडे स्थलांतरीत केल्याचे सांगण्यात आले आहे..

 

   “विशेष म्हणजे सारखणी–मांडवी हा रस्ता अरुंद असून रात्रीच्या वेळी वेगमर्यादा न पाळता वाहने चालवली जात असल्याने याठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे. विशेषतः पिकअप व मालवाहू वाहनांच्या भरधाव वेगामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे जीव धोक्यात येत आहेत…  परिणामी काल रात्री झालेल्या या दुर्घटनेमुळे घटनाग्रस्त लिंगी गावात शोककळा पसरली असून अपघातग्रस्त बावणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. याप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत चारचाकी वाहनचालकाविरुद्ध सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने याबाबतची अधिक माहिती प्राप्त होवू शकली नाही..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close