शैक्षणिक

नुतन वर्षानिमित्त PMG कौशल्य विकास केंद्र वाई बाजार येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न…..

"गटविकास अधिका-यांच्या उपस्थितीत नविन वर्षाचे उत्स्फुर्त स्वागत..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
  नविन वर्षाचे औचित्य साधून येथील PMG कौशल्य विकास केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला असून पत्रकार व गटविकास अधिका-यांच्या उपस्थितीत नविन वर्षाचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले…
     आज दि. १ जानेवारी रोजी कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथील प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्रावर माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला.. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून येथील अनेक पत्रकार बांधवांची प्रमुख उपस्थिती होती.  दरम्यान नववर्षाचे औचित्य साधून नविन वर्षाच्या उत्स्फूर्त स्वागतासाठी येथील विद्यार्थ्यांनी सर्व इमारत तसेच क्लासरूमसह परिसर स्वच्छ व सुशोभित करून उपस्थितांचे लक्ष वेधले…

   विशेष म्हणजे कौशल्य विकास व उधोजगता मंत्रालयभारत सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र वाई बाजार तालुका माहुर येथे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम सुरु असून सुशिक्षित बेरोजगारांना या ट्रेनिग सेंटर मध्ये विनामूल्य प्रवेश दिला जातो. या सेंटर मध्ये अठरा ते पस्तीस वयोगटातील युवक युवतींना संगणक व सिलाई मशीन कोर्स ला प्रवेश देऊन नोकरी तसेच रोजगार व्यवसायाची संधी उपलब्ध होणार असल्याने गरजू युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अदिकारी सुरेश कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले.. तर सुसज्य इमारत, वाचनालय आधुनिक लॅब क्लास रूम प्ले ग्राउंड प्रशिक्षित ट्रेनर स्टॉप, प्रोजेक्टर, अग्निशामक यंत्र इत्यादी सोई सुविधा उपलबध करून दिल्या आहेत. त्यामुळे आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी माहुर तालुक्यातील युवक युवतींनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा असेही त्यांनी सांगितले..

   यावेळी नववर्षाच्या आगमनाप्रित्यर्थ गटविकास अधिकारी सुरेशजी कांबळे यांच्यासह पत्रकार साजिद खान, कार्तिक बेहेरे, राजकुमार पडलवार, रुपेश मोरे, राजिक शेख व मान्यवरांच्या आदींच्या हस्ते केक कापून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.. तद्नंतर  यावेळी सेंटर संचालक मनोज किर्तने यांच्यासह गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले…
   यावेळी जेष्ठ पत्रकार राजकुमार पडलवार यांच्यासह  कॉ. प्रल्हाद चव्हाण, इंजि. कुणाल यादव, विकास शिंदे सर, नम्रता किर्तने, ट्रेनर शोभाताई राठोड, सागर थोन्टे, प्लेसमेंट ऑफिसर मुकेश ठाकूर व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कॉ. राजकुमार पडलवार यांनी, तर प्रास्ताविक तसेच आभार केंद्र संचालक मनोज किर्तने यांनी केले.. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close