क्राइम

‘रमजान ईद’चे स्टेटस् पाहून पित्त खवळल्याने नांदेडच्या महिला वकीलास जातीवाचक शिवीगाळ…

"नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयातील लाजिरवाणा प्रकार; तक्रार दाखल"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

नांदेड, प्रतिनिधी

रमजान ईद निमित्त शुभेच्छांचे व्हाटस् अप स्टेटस् ठेवण्याच्या कारणावरुण जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्याचा लाजीरवाणा प्रकार नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात दि.१२ एप्रिल रोजी घडला असून याप्रकरणी शिवीगाळ करणा-या ‘त्या’ वकील महिलेवर अनू. जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यासंबंधीची लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे पिडीत महिला वकीलाने केली आहे..

 

नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात वकीलीचा सराव करणा-या एका (बौद्ध) महिला वकीलाने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या लेखी तक्रारीनुसार दि. ११ रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असल्याने रमजान ईद दिनाच्या पर्वावर तिने शुभेच्छा दर्शक वॉटस्अप स्टेटस तिच्या नंबरवर ठेवले होते. त्या स्टेटसवर जळफळाट होवून येथेच कार्यरत असलेली दुसरी महिला वकील श्रीजा यशवंतकर हिने… “ते स्टेटस तू स्टेटस का ठेवलेस ? तू मुस्लिम आहेस का..? असे म्हणत पिडीतेला जातीवाच शिवीगाळ करताना.. तू लां…चे स्टेटस का ठेवले.? तू लां..ची आहेस का ?  “तुम्ही महाराचे लोक असेच असता.. मुस्लिम समाजाचे स्टेटस ठेवायचे नाही असे म्हणून ती माझ्या अंगावर मारण्यासाठी आली होती..त्यावेळी लेडीज रूम मधील उपस्थित असलेल्या अॅड महिलांनी तिला थांबवले त्यावेळी ती म्हणाली.. तुला मी पाळलेले गुंड बोलावून तुला मारते… तसेच तू काळी आहेस तुझी माझ्या सारख्या गोऱ्या मुली बरोबर उभी राहण्याची लायकी नाही.. तुमच्या समाजाला आम्ही सहज संपवू शकतो असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ करून बोलत असल्याची गंभीर बाब पिडीतेने तक्रारीत नमूद केल्या आहेत….

 

 

 विशेष म्हणजे नांदेडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चक्क कायद्याचा धडे गिरवणा-या व कायद्यांच्या प्रभावानेच पोट भरणा-या  वकीलांकडूनच जातीयवादाचे पालनपोषण होत असल्याच्या या लाजीरवाण्या प्रकाराने संपुर्ण न्यायालयीन परिसर ढवळून निघाला असून या लाजीरवाण्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.. तर ‘त्या’ जातीयवादी व अल्पबुद्धीच्या महिला वकीलावर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत यासाठी लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांसह अभिवक्ता संघाकडेही पिडीत महिला वकीलाने केली असून याप्रकरणी तक्रार न करण्यासाठी तक्रारदार वकील महिलेवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला जात असल्याची गंभीर बाब पिडीतेने सांगीतली आहे.. त्यामुळे संबंधितांकडून जिवाला धोका असल्याबाबतची नावांसह लेखी तक्रारदेखील केल्याचे समजते… याप्रकरणी होणा-या कार्यवाहीकडे संपुर्ण अभिवक्ता संघ निमूटपणे पाहत असून प्रकरणातील दोषी व तक्रारदार या दोघीही पेशाने वकीलच असल्याने नेमकी बाजू कुणाची घ्यावी..? हा प्रश्न अभिवक्ता संघासाठी मात्र ‘अवघड जागचे दुखणे’ होवून बसला आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close