ईतर
कर्जबाजारीपणास कंटाळून अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या…
"तब्बल 400 मिली विष प्राशन करून संपवली जिवनयात्रा ; आठवड्याला 10 टक्के व्याज वसूल करणारे सावकार वाई बाजार येथे सक्रीय..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
कर्जबाजारीपणास कंटाळलल्या अल्पभूधारक शेतक-याने तब्बल चारशे मिली विष प्राशन करून आपली जिवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना आज रोजी उघडकीस आली असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असतानाच पिडीत कुटुंबियांना शासनााने तातडीची मदत देण्याची मागणी परिसरातून होत आहे….
माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील अल्पभूधारक शेतकरी राजू उर्फ आतिष वामनराव शिंदे वय 44 वर्ष धंदा शेती या अल्पभूधारक शेतक-याकडे दोन भावात मिळून 41 आर अशी सामाईक शेती आहे.. त्याच शेतीच्या आधारे ते आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवतात… तथापि शेतकी उत्पन्नाच्या भरवश्यावर कुटुंबाचा प्रपंच चालवताना खाजगी सावकारीचे प्रचंड कर्ज झाले असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे… दरम्यान काल दि. १० रोजी बाहेरगावच्या एका लग्नसमारंभाला जाऊन येतो असे सांगून गेलेल्या शिंदे यांनी दुपारी सव्वाबारानंतर कुणाचाही कॉल घेतला नाही त्यामुळे घरची मंडळी चिंतेत होती.. परिणामी सगळीकडे शोधाशोध करूनही काही ठावठिकाणा लागत नव्हता..
दरम्यान आज सकाळी वाई बाजार नजिकच्या वाघाई टेकडी परिसरात त्यांचा मृतदेह आढळला असून त्यांच्या मृतहेहाशेजारी ‘मोनोसील’ नामक 500 मिलीच्या विषाची बाटली आढळून आली.. त्यातील तब्बल 350 ते 400 मिली औषध प्राशन केल्याचे प्रथमत: दिसून येेत असून घटनेची माहीती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्यासह पो.हे.काँ. पठाण व पो. काँ. संजय शेंंडे यांं घटनास्थळावर धाव घेवून मयतास शवविच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.. दरम्यान अत्यंत शोकाकुल वातावरणात दुपारी मयत शेतक-यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून मयत शेतक-याची कौटुंबिक परिस्थिती पाहता शासनाने पिडीत कुटुंबाला तातडीने मदत द्यावी अशी भावना उपस्थितांसोबतच परिसरातून व्यक्त होत आहे…..

“विशेष म्हणजे वाई बाजार येथे मागील काही वर्षांपासून आठवड्याला शेकडा 10 टक्के… प्रमाणे म्हणजेच (उदा. एखाद्याकडून 1000/-₹ हजार रूपये घेतल्यास आठवड्याच्या दिवशी शंभर रूपये) असे त्या मुद्दल रकमेचे व्याज घेणारी एक टोळी कार्यान्वित असल्याची माहीती समोर येत असून ‘तोच’ आठवड्याला 10 टक्के वसूली करणारा व शिंदे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला इसम काल रोजीही शिंदे यांच्या घरी आल्याची माहीती समोर आली आहे… एकंदरीत वाई बाजार येथे गोरगरीबांच्या गरजेचा फायदा घेवून आठवडी 10 टक्के म्हणजेच महिणा 40 टक्के व्याज वसूली करणा-या अवैध सावकारीने थैमान घातल्याची परिस्थिती असून अशाप्रकारचे अवैध सावकारीचे धंदे करून सर्वसामान्यांना मृत्यूच्या खाईत लोटणा-यांंचा शोध घेवून कडक कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली असून यावर कठोरात कठोर कार्यवाही करण्याची गरज असल्याची भावना नाव न सांगण्याच्या अटीवर अनेकांनी बोलून दाखवली आहे…..

