पाचुंदा दूहेरी खून प्रकरण… पोलीसांच्या चाणाक्ष बुद्धीने 12 तासाच्या आत आरोपीचा पर्दाफाश.. हिवळणी जळीत हत्याकांडाचे काय..?
"माहूर तालुक्यातील एका आरोपीसह विदर्भातील एक असे दोघे पोलीसांच्या ताब्यात ; हिवळणी जळीत कांडाचा मुहुर्त केंव्हा....?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील दूहेरी खून प्रकरणाचा यशस्वी तपास करताना पोलीसांनी चाणाक्ष बुद्धीने अवघ्या 12 तासाच्या आत आरोपीचा पर्दाफाश केला असून माहूर तालुक्यातील एका आरोपीसह विदर्भातील एक असे दोन आरोपी गजाआड करून नांदेड जिल्ह्याच्या पोलीसांनी अभिनंदनास पात्र असल्याचे सिद्ध केले असले तरी मागील वर्षभरापासून ‘अन-डिटेक्टेड’ असलेल्या हिवळणी जळीत हत्याकांडाचे काय..? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होवून पोलीसांच्या सर्वच शाखांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे……
माहूर तालुक्यातील मौजे पाचुंदा येथे काल दि.२० नोव्हेंबर रोजी यातील पिडीता व मयत अंतकलाबाई अशोक अडागळे (वय ५५ वर्ष) व अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय ५० वर्ष) या दोघी सख्ख्या जावा शेतात कापुस वेचणी करीत असतााना अज्ञात लुटारूंनी त्यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागीने लुटून नेऊन त्या दोघींचाही गळा दाबुन जिवे मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानुसार पोलीस स्टेशन माहुर येथे गुन्हा दाखल होऊन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्यासह अप्पर पोलीस अधिक्षक भोकरच्या अर्चना पाटील, माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी घटनास्थळी भेट देवुन तात्काळ गुन्हा उघडकिस आणण्याच्या दृष्टीने हरकतीत येताना आपल्या अधिनस्तांना योग्य त्या सुचना दिल्या… याकामी तब्बल चार टीम नेमुन अदिलाबादसह यवतमाळ व उप विभाग माहुर व किनवट येथे पाठवून आरोपीच्या शोध कामी माहीती हस्तगत करुन संशयीत आरोपीचा शोध घेण्याकामी कमालीची तत्परता दाखवून अवघ्या बारा तासाच्या आत आरोपींना जेरबंद करून पोलीसांनी उल्लेखनीय कार्य केले ही बाब कुणीही नाकारू शकत नाही. परंतू, मागील वर्षी माहूर तालूक्यातील मौजे हिवळणी फाट्यानजीक एका महिलेला जिवंत जाळलेला अज्ञात आरोपी अद्यापही मोकाटच फिरून नांदेड पोलीसांना खुुुले आव्हान देत असल्याने त्याचे काय..? हा यक्षप्रश्न तालुक्यातील जनतेला भेडसावत असून जळीत कांडातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीसी यंत्रणा कमी पडत असल्याने त्यातील आरोपी पोलीसांपेक्षा भारी. ? का पोलीसांपेक्षाही आरोपी दोन पावले पुढे..?? असा गंभीर प्रश्न जनसामान्यांना पडला आहे…
दरम्यान पाचुंदा डबल मर्डर प्रकरणात संशयीत आरोपीच्या ‘स्केच’ वरुन आरोपीची माहिती घेताना आज दि. 21 रोजी पोलीसांना गोपनीय बातमीदारा मार्फत प्राप्त माहितीनुसार यातील संशयित आरोपी दत्ता सुरेश लिंगलवार रा. सदोबा सावळी ता. आर्णी जि. यवतमाळ हा गंगाजी नगर, (सेलु करंजी) ता. माहुर जि. नांदेड येथील त्याचे नातेवाईकाच्या शेतातील अखाडयावर लपुन बसला असल्याची खात्रीशीर माहीती पोलीसांना मिळाली. त्यावरून आरोपीस ताब्यात घेतल्नंयानंतर त्याचे नाव दत्ता सुरेश लिंगलवार वय 38 वर्ष व्यवसाय बेकार रा. सदोबा सावळी ता. आर्णी जि. यवतमाळ असे असल्याचे पोलीसांना समजले. त्यात सखोल विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा मित्र गजानन गंगाराम येरजवार वय 41 वर्ष व्यवसाय सुतारकाम रा. गंगाजीनगर, करंर्जी ता. माहुर जि. नांदेड यांनी दोघांनी मिळून केल्याचेही सांगितले. शेवटी या प्रकरणातील दुसरा आरोपी गजानन येरजवार हा सुध्दा पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यान्ही गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी गुन्हयात वापरलेली एक मोटार सायकल व दोन मोबाईल तपास कामी ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलीसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.. तर दुसरीकडे आज दि.२१ रोजी मयताचे शवविच्छेदन माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात होवुन अत्यंत शोकाकूल वातावरणात ‘त्या’ दोन्ही महीलांवर पाचुंदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले …
“विशेष म्हणजे काल घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा अवघ्या चोवीस तासात छडा लावल्याचा ‘आव’ आणून नांदेड पोलीस प्रशासन “फुशारक्या” मारत असले तरी मागील वर्षात हिवळणी येथील महिलेला जिवंत जाळून अद्यापही “अनडिटेक्टेड” असलेल्या जळीत हत्याकांडाचे काय..? हा प्रश्न नांदेड पोलीसांसमोर अद्यापही ताठ मानेने उभा उसून नांदेड पोलीसांच्या सर्वच विभागांना खुुुले “चॅलेंज” देवुन “तू भारी..की मी भारी..??” हा नांदेड पोलीसांची ‘खिल्ली’ उडवणारा प्रश्न उपस्थित करत आहे… त्यामुळे पाचुंदा दुहेरी हत्याकांडाचा अवघ्या चोवीस तासात तपास करून तात्पुरती का होईना जनतेची ‘वाहवा’ घेणा-या पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील तातडीच्या यशाने जास्तीचे हुरळून न जाता हिवळणी जळीत हत्याकांडाचा सोक्षमोक्ष लावून आपले प्रलंबित कर्तव्य सिद्ध करावे. तरच नांदेड पोलीसांचा कामगीरीला महत्व प्राप्त होईल असा न्यायिक सुर तालुक्यातील जनतेतून उमटत आहे…





