पाचुंदा डबल मर्डर प्रकरणात नवा ‘ट्विस्ट….? आठ दिवसाआगोदर ‘पानोळा’ येथे लुटलेल्या महिलेने अटक आरोपीला ओळखले…..
माहूर पोलीसांत याच आरोपींविरूद्ध दुसरा गुन्हा दाखल..

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
पाचुंदा डबल मर्डर प्रकरणात नवा ‘ट्विस्ट समोर आला असून अटक केलेल्या आरोपींनीच आठ दिवसापुर्वी ‘पानोळा’ येथील लुटलेल्या ‘त्या’ पिडीत महिलेने देखील यातील अटक असलेल्या आरोपींना ओळखल्याने माहूर पोलीसांत आता याच आरोपींविरूद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला आहे….
माहूर तालुक्यातील मौजे पाचुंदा येथे दि. २० रोजी दोन महिलांना लुटून त्यांचा खून करणाऱ्या आरोपीस अवघ्या चोवीस तासात पोलीसांनी जेरबंद केले. त्यामुळे अवघ्या आठ दिवसापुर्वी पाचुंदा पासून अवघ्या सहा ते सात कि.मी. च्या अंतरावर असलेल्या पानोळा येथेेेही याच आरोपींनी एका महिलेला लुटल्याचे समोर आले आहे.. यातील आरोपींना त्या महिलेने ओळखले असून त्याबाबतचा जबाब देखील माहूर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर होवूू त्या महिलेने दिला आहे.. त्यामुळे लुटल्या गेलेल्या तिसऱ्या महिलेच्या तक्रारीवरून यातील दोन्ही आरोपी विरुद्ध जीवे मारण्याच्या प्रयत्न करून लुटमार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान पाचुंदा येथील घटनेनंतर आरोपीच्या कोठडीदरम्यान प्रकरणाच्या चौकशी अंतर्गत आठ दिवसापुर्वी लुटल्या गेलेल्या त्या महिलेस माहूर पोलीस ठाण्यात आणून अटक केलेल्या आरोपींंची ओळख पटविली असता महिलेने तात्काळ त्या दोन्ही आरोपींना ओळखून याच आरोपींनी मला महाराण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करत सोने चांदी नगदी रक्कम लुटून नेल्याची कबुली जबाब दिला आहे. त्यामुळे आज दि. २२ रोजी कोठडीतील दोघांवर आजचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
यातील महिनेने दिलेल्या तक्रारीनुसार पानोळा येथील सौ. सुशीला विष्णू राठोड वय 50 वर्ष ह्या दि. 9 नोव्हें. रोजी दुपारी 2 वा. च्या सुमारास स्वतःच्या शेतामध्ये कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. त्या दिवशी वानोळा येथील रविवारचा आठवडी बाजार असल्याने तिचे पती बाजार करण्यासाठी वानोळा येथे गेले होते. तेव्हा शेतात एकटीच असल्याचे पाहून दुपारी 03.30 वाजताचे सुमारास एक अनोळखी इसम माझ्या समोर आला. त्यास मी काय आहे..? म्हणुन विचारले असता तो माझ्या अंगावर येवुन मला खाली पाडुन गळ्याला दाबुन धरले. मी त्यास मारु नको असे म्हणाले.. त्यानंतर तो माझ्या अंगावरुन उठला त्याने मला ओढत मारत बंडू आडेच्या शेताजवळ घेवुन गेला. तेथे चाकु काढला व त्याने मला अंगावरील दागिने काढुन दे म्हणुन चाकुचा धाक दाखवुन धमकी दिली.. तेव्हा 3600/- रुपये किमतीचे पायातील चैन जोडवे तीन तोळे, 24000/- रुपये गळ्यातील दोन ग्राम सोन्याच मंगळसूत्र, 12000/- रुपये 10 तोळे पायातील चैन, 3600/- रुपये कानातील तीन ग्राम सोन्याचे रिंग, असे एकुण 75600/- रुपये अंदाजे किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चाकुचा धाक दाखवुन जबरीने काढुन घेतले… त्यावेळी त्याला वरच्यावर फोन येत होता. तो कट करत होता. तर शेताच्या पलीकडे एक इसम मोटार सायकल घेवुन उभा होता. त्याचा तो साथीदार होता. तेव्हा मी या अनोळखी इसमास मला मारु नको सोडुन दे म्हणुन विनंती केली. त्याने सदरचे घटना कोणास सांगतीलस तर तुला जिवानिशी मारुन टाकतो. म्हणुन धमकी दिली. तेव्हा तुझ्या विषयी मी कोणाला काही सांगत नाही. तु मला सोडुन दे म्हणुन विनंती केल्याने तो सोडुन निघुन गेला. त्याने मला कोणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्या ईसमांना माझ्या समोर हजर केल्यास मी त्यांना ओळखीन… सदरील महिलेने अशी फिर्याद दिल्याने अटक केलेल्या आरोपींना त्या महिलेस दाखवून ओळख परेड केली असता महिलेने तात्काळ त्या आरोपींना ओळखले …
“प्रकरणातील दोन्ही आरोपींविरूद्ध पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून प्रकरणाचा तपास माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद घोडके हे करीत असून पो.हे.काँ. गजानन चौधरी, सत्यपाल मडावी, सारिका राठोड तसेच शिल्पा राठोड हे मदत करीत आहेत….





