‘ईद’ च्या पार्श्वभूमीवर माहूर पोलिस ठाण्यात शांतता समिती ची बैठक..!
"जातीय सलोखा व भाईचारा कायम ठेवण्याचे प्रशासनाकडून आवाहन"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
शासनाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत दरवर्षाप्रमाणे यंंदाही बकरी ईद सण उत्साहात साजरा करण्याबरोबरच कायद्याने संमती दिलेल्या प्राण्यांचीच कुर्बानी द्यावी व कायद्याचे पालन करावे यासाठी कोणत्याही समाजाच्या धार्मीक भावना दुखणार नाही याची काळजी घ्यावी. सोबत हा सण साजरा करताना पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी व्यक्त केले…
माहूर पोलीस ठाण्यात ईद च्या पार्श्वभुमिवर आयोजित शांतता कमेटीच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.. दरम्यान जातीय सलोखा व भाईचारा नेहमीच अबाधित ठेवण्याची आपल्या शहराची परंपरा असून ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत… तर पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत उत्सव आनंदात साजरे करावेत. प्रेम,भक्ती व कृतज्ञता व्यक्त करत असताना त्याग, बलिदान,सेवा, समर्पणाचा संकल्प, वचन व इरादा व्यक्त करणे व यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हजरत इब्राहिम अलैहीस्लाम व त्यांचे पुत्र हजरत इस्माईल अलैहीस्लाम यांच्या त्याग व बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ बकरी ईद सण साजरा करण्यात येतो. आपल्याकडील प्रिय वस्तू दान करण्याची वृत्ती सर्वांना अंगीकृत व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो. कायद्याने संमती दिलेल्याच प्राण्यांची कुर्बानी देेेवून कायद्याचे पालन करावे. आपल्या एखाद्या कृत्यामुळे संपूर्ण समाजालाच अपमानित व्हावे लागेल किंवा समाजावरच आक्षेप येईल असे कृत्य कोणीही करू नये.वअसे आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले.
तर सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी कायदा तोडणाऱ्या काही चुकीच्या कृत्यांमुळे पोलिसांना गुन्हे दाखल करावी लागतात. याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला व पर्यायाने त्यांच्या कुटुंबाला भोगावे लागतात. आपल्या हातून कायद्याचा भंग होणार नाही असेच आचरण ठेवून बकरी ईद आनंदात व शांततेत साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले…
या वेळी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिस प्रशासनाला सहकार्य असेल कुठलीचे बेकायदा कृत्य होणार नाही याची खबरदारी घेतल्या जाईल असे आश्वासन समाजाच्या प्रतिनिधींनी दिले आहे.

