क्राइम

माहूरमध्ये बनावट नोटा चालविण्याच्या प्रयत्नात एका विधिसंघर्षीत बालकाला पकडले… गुन्हा दाखल..!

"19 हजार 500 रुपयाच्या बनावट नोटा जप्त ; शहरात बनावट नोटा चालविणारे मोठे 'मास्टरमाईंड' कार्यरत असण्याची शक्यता..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

माहूर, प्रतिनिधी

माहूरमध्ये बनावट नोटा चालविण्याच्या प्रयत्नात एका विधिसंघर्षीत बालकाला पकडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून एका विधीसंघर्षीत बालकाकडून एकोणीस हजार पाचशे रूपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याने शहरात बनावट नोटा चालविणारे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यतेने शहरात एकच खळबळ उडाली आहे….

 

माहूर येथील सोनापिर बाबा दर्गाह येथे सुरू असलेल्या उर्स यात्रेदरम्यान दि. १० मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास माहूर पोलीस स्टेशनचे पोका संग्राम पवार, पो.कॉ. गजानन जाधव व पोकॉ राठोड हे सोनापिर बाबा दर्गाह येथे सुरू असलेल्या उर्स यात्रेत पायी पेट्रोलिंग करत होते. यावेळी क्रॉस झुल्याजवळील तिकीट काऊंटरवरील महिलेने एका मुलाकडून बनावट नोट देऊन तिकीट घेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.. यावरून पोलिसांनी तत्काळ त्या मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने माहूर येथील वार्ड क्र. ७, येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ६ बनावट भारतीय चलनी नोटा, एकूण ३ हजार रुपये मिळून आले…

 

 

दरम्यान पुढील चौकशीत या नोटा त्याच्या आत्याचे पती यांच्या घरातून आणल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशावरून पोलिसांनी पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता यावेळी घरातील रॅकमधील कपड्याखाली ५०० रुपयांच्या ३३ बनावट नोटा, एकूण १६ हजार ५०० रुपये किंमतीच्या नोटा आढळून आल्या.. त्यावेळी पोलीसांनी पंचनामा करून सर्व बनावट नोटा जप्त केल्या असून एकूण ३९ बनावट नोटा १९,५०० रुपये हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १७९ व १८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शरद घोडके पो.हे.काँ. लक्ष्मण मेश्राम, पो.काँ. संग्राम पवार, पो.काँ. संघरत्न सोनसाळे, होमगार्ड शेख गणी, दिलीप जाधव, पंकज मुरकुटे, उमेश भगत, एस. पी. भगत आदी करत आहेत….

 

“विशेष म्हणजे श्रीक्षेत्र माहूर हे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण पीठ असल्याकारणाने येथे बाहेरून येणा-या भाविकांची संख्या प्रचंड आहे. अशा परिस्थितीत शहरात सापडलेल्या बनावट नोटा एका विधीसंघर्षीत बालकाकडे सापडणे, म्हणजे त्या बालकाच्या मागे निश्चितच कुणी या व्यवसायातील कुख्यात व्यक्ती असावा.. तो नेमका कोण..? किंबहूंना बनावट नोटा जेंव्हा बालकाच्या हातापर्यंत पोहोचतात, याचा अर्थ बनावट नोटा चलनात आणण्याची प्रक्रिया शहरात फार पुर्वीपासून सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराला पोलीस प्रशासनाने गंभीरतेने घेणे अत्यंत गरजेचे असून यामागील ख-या सुत्रधाराचा ‘तो’ चेहेरा जनतेसमोर आणने क्रम:प्राप्त आहे. अन्यथा खरा सुत्रधार पकडला न गेल्यास बनावट नोटांच्या धास्तीने याचा थेट परिणाम माहूर शहरातील व्यापा-यांच्या दैनंदीन व्यवहारावर पडू शकतो.. हे त्रिकालबाधीत सत्य कुणीही नाकारू शकत नाही….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close