शैक्षणिक
53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ‘जिनियस किड्स’ इ. ९ वी ते २२ वी गटात तालुक्यातून प्रथम…
....

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर,प्रतिनिधी
५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माहूर तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूर यांनी इयत्ता ९ वी ते २२ गटात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून विद्यार्थ्यांच्या प्रयोगाला प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे सर्वच स्तरातून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे अभिनंदन केले जात आहे.
माहूर येथील श्री जगदंबा हायस्कूल येथे दि. 16 डिसेंबर रोजी झालेल्या ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले. तर गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्यासह माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, शिक्षण विस्तार अधिकारी संग्राम कांबळे, गंगाधर बिरमवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यासविज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील जवळपास शंभराहून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला.. त्यात ‘जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूर’ येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता नववी ते बारावी गटात माहूर तालुक्यातून प्रथम स्थान पटकाविला. त्यात त्यांच्या प्रयोगाला प्रथम क्रमांक देण्यात आला… या प्रयोगाचे सादरीकरण ऋषिकेश पिल्लावार, कन्हैया जयस्वाल, नैतिक राठोड या इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी केले. तर या प्रयोगासाठी सहकार्य व मार्गदर्शन विज्ञानाचे शिक्षक सोहेल चव्हाण व आकाश राठोड यांनी केले. या प्रयोगासाठी मुख्याध्यापक संतोष कुमार व उपमुख्याध्यापक आयफाज शेख यांनी मोलाचे सहकार्य केले…
“आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या युगाचा विचार करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने अशा विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनातून उद्याचे शास्त्रज्ञ घडविण्यात जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी व्यक्त केले. यावेळी जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माहुर तालुकाध्यक्ष शेषराव पाटील यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या…





