शैक्षणिक

53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता ८ वी गटातून वाई बाजारचे ‘पीएम श्री.जि.प.हायस्कूल’ तालुक्यातून प्रथम..!

"वाई बाजार शाळेच्या 'उदयोन्मुख तंत्रज्ञान' या सादरीकरणाला पसंती..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
   53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता ८ वी गटातून वाई बाजारचे ‘पीएम श्री.जि.प.हायस्कूल’ च्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातून प्रथम पटकावला असून ‘उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या सादरीकरणाला निरिक्षकांनी पसंती देवून प्रथम क्रमांक बहाल केल्याने विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक होत आहे…
  दि. १६ डिसेंबर रोजी माहूर येथील श्री जगदंबा हायस्कूल येथे ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. यात तालुक्यातील तब्बल शंभरपेक्षाही अधिक शाळांनी सहभाग घेतला.. त्यात माहूर तालुक्यातील पीएम श्री.जि.प.हायस्कूल वाई (बाजार) या शाळेकडून प्राथमिक स्तरातून इयत्ता आठवी ने सादर केलेला ‘उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या विषयावर आधारित प्रयोगास प्रथम क्रमांक देण्यात आला.
              या प्रयोगाचे सादरीकरण ओम सोनूने या विद्यार्थाने केले.तसेच इयत्ता आठवीतील इतर विद्यार्थ्यांकडून त्याला साथ मिळाली.या प्रयोगासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून शाळेचे शिक्षक गुरुलिंग वाळके, प्रशांत घडीले, अर्चना राजेंद्र गोल्हार तर शाळेतून मुख्याध्यापक अजय राठोड,मिलिंद कंधारे,अध्यक्ष अमजद पठाण यांनी सहकार्य केले.
           अधुनिक तंत्रज्ञान व बदलते युग याचा विचार करून नेहमीच आम्ही विज्ञान प्रदर्शने घेत असतो. यातून उद्याचे शास्त्रज्ञ घडविण्यात शाळा महत्वाची भूमिका बजावते तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा हा या विज्ञान प्रदर्शनाचा हेतू ठेवून आम्ही आयोजन केले आहे असे मनोगत व्यक्त करत पीएम श्री.जि.प.हायस्कूल वाई च्या प्रथम आलेल्या प्रयोगाचे व मार्गदर्शकांचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार याच्यासह ग्रामपंचायत, गावकरी तसेच शाळेच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close